पारनेर/प्रतिनिधी : 
पारनेर येथील भाजपा कार्यालयात पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ९३ वी जयंती आणि सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची ४५ वी पुण्यतिथी निमित्ताने विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याच्या जडणघडणीत या दोन्ही थोर नेत्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची उजळणी करण्यात आली.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीला नवे परिमाण देत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले. त्यांचे सुपुत्र पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे.या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, सुपा मंडल अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, कान्हूर निघोज मंडल अध्यक्ष किसन शिंदे, तालुका उपाध्यक्ष अर्जुन नवले, नगरसेवक अशोक चेडे, नगरसेवक युवराज पठारे, सरपंच लहू भालेकर, चेअरमन प्रकाश ठाणगे, दीपक इंगळे, हरेराम खोडदे, मोहन काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला.कार्यक्रमात सहभागी कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांच्या सहकार, शिक्षण आणि सामाजिक समर्पणाच्या मूल्यांना आत्मसात करून समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. या दोन्ही नेत्यांच्या स्मृतींना अभिवादन करत कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण करणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *