भाळवणी/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत  पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील प्राथमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवित उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. यापरीक्षेत पंधरा विद्यार्थी पात्र झाले आहेत. तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सुद्धा १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
       शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये प्राथमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवित आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. एकूण पंधरा विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले आहेत. यामध्ये 
अश्विन संजय गिरवाल – ३०० पैकी २४४
सुयश लक्ष्मण पाचारणे – ३०० पैकी २२४
अन्विता राजाराम वाघ – ३०० पैकी १९० 
प्रतिक काशिनाथ बाचकर – ३०० पैकी १८६ 
आरव विजय वाघ – ३०० पैकी १८०
कृष्णा अनिल बिडे – ३०० पैकी १७०
गायत्री किसन वाघ – ३०० पैकी १६८ 
कुणाल मच्छिंद्र चितळकर – ३०० पैकी १५८
कार्तिक राजू थोरात – ३०० पैकी १६८ 
संचित बबन ठोकळ – ३०० पैकी १४४ 
माही खलिल शेख – ३०० पैकी १४४ 
गौरी राजेंद्र बुचुडे – ३०० पैकी १४० 
आराध्या अनिल कपाटे – ३०० पैकी १४० 
साई आप्पासाहेब वाबळे – ३०० पैकी १२८ 
श्रेयश सोपान सासवडे – ३०० पैकी १२८ गुण मिळवून पात्र झाले आहेत.
तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सुद्धा १८ विद्यार्थी पास झाले आहेत. वरील शिष्यवृत्ती परीक्षेतील काही विद्यार्थी व खुशी दीपक चितळकर, स्नेहा शरद चितळकर, संघर्ष अंबादास खेडकर, श्रेया पंकज डोळझाके, 
सत्यजित कैलास थोरात हे उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक राजाराम वाघ, भावना बेरड, प्रशांत पादीर, समाधान भुसारे व विषय शिक्षक लतिफ राजे यांचे मार्गदर्शन लाभले.
     यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शाहिद काझी, सचिव रेहान काझी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक विनोद लोंढे, निरीक्षक तुकाराम कातकडे, सरपंच नंदाताई भागाजी गावडे, उपसरपंच बबनराव पवार सर, सेवा सोसायटीचे चेअरमन भागाजी गावडे, माजी सरपंच डॉ राजेश भनगडे, राजेंद्र भालेराव, चंद्रकांत भालेराव, शिक्षण विस्तार अधिकारी कांतीलाल ढवळे, केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे, सुखदेव चितळकर, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व सेवा सोसायटी सदस्य, मुख्याध्यापक संदीप महांडुळे, प्राचार्य बापूसाहेब रूपनर, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.


अश्विन संजय गिरवाल याने ३०० पैकी २४४ गुण मिळवून उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. त्याने पेपर क्रमांक दोन बुद्धिमत्ता चाचणी व इंग्रजी यात इंग्रजी विषयाचे २५ पैकी २५ प्रश्नांची बरोबर उत्तरे सोडवून ५० गुण मिळविले आहे. तसेच तो भाळवणी बिट मध्ये सर्वाधिक गुण मिळविणारा विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *