पारनेर / प्रतिनिधी,
पारनेर विकास आराखडा मंजुरीवरून सुरू झालेल्या वादाला शिवसेना (शिंदे गट) ने आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. पारनेर तालुका प्रमुख अरुण ठाणगे यांनी अशोक चेडे यांना थेट लक्ष्य करून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पारनेर शहर विकास आराखड्याला मंजुरी
डिसेंबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर शहराचा प्रलंबित विकास आराखडा (डीपीआर) मंजूर केला. हा आराखडा अनेक वर्षांपासून रखडला होता, ज्यामुळे पाणी, वीज, संविधान भवन, क्रीडांगण आदी अनेक विकासकामे प्रलंबित होती. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवली. या निर्णयामुळे पारनेर शहराला सुमारे ३०० कोटी रुपयांच्या विकासकामांना चालना मिळणार आहे.
🔶🔶🔶🔶🔶
शिवसेनेचे आक्रमक प्रत्युत्तर…
अशोक चेडे यांनी या मंजुरीवरून श्रेय घेण्याचा प्रयत्न आणि राजकीय टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते पाहून राव ठाणगे यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले:
“सुजित झावरे पाटील यांनी पाठपुरावा केला, यात वावगं काय? लोकांसाठी धावपळ करणे हा गुन्हा आहे का?”
– “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विषय गांभीर्याने घेत तात्काळ मंजुरी दिली. मग तुमच्या पोटात का दुखतंय? पारनेरचा विकास व्हायला लागला, याचा आनंद व्हायला हवा की दुःख?”
– “चेडे स्पष्ट सांगा, पारनेरच्या विकासाबद्दल तुम्हाला आनंद आहे की दुःख? विकास आराखडा मंजूर झाला, ही शहरासाठी मोठी संधी आहे.”
– “तुम्ही अनेक वर्षे नगरसेवक आहात. मग इतक्या काळात मंत्रालयीन पातळीवर ठोस पाठपुरावा का केला नाही? आता दुसऱ्याने प्रयत्न केले तर पोटात दुखण्याचे नक्की कारण काय?”
– “पारनेर शहरासाठी काम करणे गुन्हा आहे का? सुजित झावरे पाटील पदावर नसतानाही लोकांच्या प्रश्नांसाठी लढतात, धावतात… हे काहींना खटकत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.”
– “पारनेरचा विकास कोणी करायचा हे तुमच्या मनावर अवलंबून नाही. विकास हा जनतेचा हक्क आहे.”
– “काम केले म्हणून सांगितले, श्रेयासाठी नाही तर पारदर्शकतेसाठी. विकासाच्या कामात अडथळे आणण्यापेक्षा साथ द्या.”
– “राजकारण करा, टीका करा; पण पारनेरच्या विकासाच्या आड येऊ नका. विकासाला विरोध करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल.”
शिवसेना शिंदे गटाने या प्रकरणात पारदर्शकता आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देत आक्रमक भूमिका घेतली आहे. सुजित झावरे पाटील यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता, आणि त्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हा वाद स्थानिक राजकारणातील श्रेयवाद आणि विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित असून, जनतेसाठी विकासकामे पुढे नेण्यावर भर देण्यात आला आहे. पारनेर शहराच्या प्रगतीसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे.




