पारनेर / ता. प्रतिनिधी  

शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६ पारनेर शहर विकास आराखड्याच्या मंजुरीवरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या राजकारणात आज पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली. नगरसेवक अशोक चेडे म्हणाले,

चेडे म्हणाले, विकास आराखड्याची प्रक्रिया ही एका दिवसात झालेली नाही. नगरपंचायत स्थापनेपासून ते मंत्रालयीन पातळीवरील पाठपुराव्यापर्यंत अनेक टप्पे पार करावे लागले. विविध नेतृत्वांनी आपापल्या काळात योगदान दिले, हे आम्ही मान्य करतो. मात्र अंतिम मंजुरीसाठी अधिकृत पाठपुरावा करून निर्णय मिळवून देण्याची जबाबदारी आमदार काशिनाथ दाते यांनी पार पाडली, ही वस्तुस्थितीच आपल्या पचणी न पडल्याने आपल्या पोटात मळमळ होतेय हे आता पारनेरकरांपासुन लपुन राहीलेले नाही.

‘आनंद की दुःख?’ असा सवाल उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना चेडे म्हणाले, “पारनेरचा विकास हा कोणाच्या मर्जीनुसार नाही; तो जनतेचा हक्क आहे. विकासाच्या निर्णयावर स्वागत करायचे की संशय व्यक्त करायचा, हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. पण मेहनत दुसऱ्याची आणि मिरवणूक आपली, ही पद्धत जनता ओळखून आहे.”

सुजित झावरे पाटील यांच्या संदर्भात त्यांनी पुन्हा स्पष्ट केले, “नगरपंचायतीशी थेट संबंध नसताना आराखड्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ राजकीय प्रकाशझोतात राहण्याची धडपड आहे. मंत्रालयीन अधिसूचना कोणी ‘पोस्ट’ केली यावर श्रेय ठरत नाही; अधिकृत जबाबदारी आणि परिणामकारक पाठपुरावा यावरच श्रेय ठरते.”

“विकासासाठी मंत्रालयात धाव घेणे गुन्हा आहे का? की श्रेयाच्या राजकारणात तथ्य मांडणेच काहींना खुपते?” असा टोला लगावत त्यांनी म्हटले की, केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी श्रेयाचे फुगे फुगवले जात आहेत.

चेडे यांनी उपरोधाने नमूद केले, “शहर विकास आराखड्याच्या मंजुरीमुळे वीट रचण्याआधीच फीत कापण्याची घाई करणाऱ्यांवर नामुष्की ओढवली, तरी आत्मपरीक्षणाचा साधा प्रयत्न दिसत नाही.”

ते पुढे म्हणाले, “मेहनत दुसऱ्याची आणि मिरवणूक आपली, ही सवय पारनेरकर जनतेने ओळखली आहे. विकास हा जनतेचा हक्क आहे; तो कोणाच्या वैयक्तिक जाहिरातीचा विषय नाही. श्रेयवादाच्या आड येऊन विकासाचा वेग रोखण्याचा प्रयत्न कोणी करू नये.”

या झंझावाती उत्तरामुळे पारनेरच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले असून, विकासाच्या प्रश्नावरून सुरू झालेला हा शब्दसंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


🔶🔶🔶🔶🔶
 “गाड्या बरोबर नळ्याची जत्रा ही अवस्था तुमची”

“अरुणराव, आपला आणि शिवसेनेचा सहवास किती? शहर विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी वेळ लागला किती? या मंजुरीसाठी आपण कष्ट केले किती? आणि आता श्रेय लाटण्याचा अट्टाहास करताय किती?
हे काय पारनेरच्या जनतेला कळतच नाही, असं तुम्हाला वाटतंय काय?” 

– नगरसेवक अशोक चेडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *