महाराष्ट्राची भरून न निघणारी हानी झाली; पारनेर येथे शोकसभा व अस्थीकलशाची शहरातून मिरवणूक
अजितदादा अमर रहे..अमर रहेच्या घोषणा…
पारनेर / भगवान गायकवाड,
स्व. अजितदादा पवार यांचे समाजासाठी मोठे योगदान राहिले असून पारनेरला त्यांनी नेहमीच विकासासाचे झुकते माप दिले. स्वच्छतेला अतिशय महत्त्व देणारा नेता म्हणून ते परिचित होते. शिस्तप्रिय आणि कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. बारामतीला त्यांनी शिक्षणाची माहेरघर उभे केले त्या ठिकाणची शैक्षणिक संस्थेच्या इमारत या दादांच्या कामाची साक्ष देतात. पारनेरच्या विकासात पवार कुटुंबाचे मोठे योगदान आहे सुप्याची एमआयडीसी त्यांच्या योगदानामुळेच निर्माण झाली अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्यात आहेत त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी यापुढील काळात आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र होण्यासाठी दोन्हीही पक्षांचे नेते एकत्र बसतील ते ठरवतील सध्या केवळ अफवा आहेत चांगला पक्ष आपल्याला उभा करायचा आहे असे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले पारनेर येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारनेर जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन आमदार काशिनाथ दाते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, पारनेर तहसीलदार गायत्री सौंदणे, जी. एस महानगर बँक अध्यक्षा गीतांजली शेळके, सुमनताई दाते, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, माजी नगराध्यक्ष विजय औटी, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
यावेळी अहिल्यानगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांनी दादांचा अस्थिकलश पारनेर येथे आणला रविवारी सायंकाळी हा असती कलश पिंपळनेर येथे आणण्यात आला व त्यानंतर तो पारनेर शहरात सोमवारी सकाळी दहा वाजता दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
यावेळी पारनेर शहरातून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे मिरवणूक काढण्यात आली व त्यांना विनम्र अभिवादन आले. या शोक सभेमध्ये व मिरवणुकीत पारनेर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांतील व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते महिला भगिनी प्रशासनातील अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
पारनेर येथे आयोजित शोक सभेला यावेळी पारनेर नगरसेवक युवराज पठारे, युवा नेते दिलीप दाते, पारनेर दूध संघाचे अध्यक्ष संदीप ठुबे, पारनेर खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय रोकडे, रिपाइं तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, माजी सभापती गणेश शेळके, माजी जि. प. सदस्य वसंत चेडे, ऍड. युवराज पाटील, उद्योजक धनंजय निमसे, विकास रोकडे, अमोल रोकडे, ऍड. पांडुरंग गायकवाड, माजी सरपंच संजीवनी आंधळे, राष्ट्रवादी नेते पंढरीनाथ उंडे, सरपंच मनोज मुंगसे, सरपंच संजय काळे, सरपंच डॉ.विलास काळे, इंद्रभान गाडेकर, सागर मैड, नगरसेवक अशोक चेडे, कांतीलाल ठाणगे, दत्तानाना पवार, सरपंच लहू भालेकर, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, शेतकरी नेते अनिल देठे, जयसिंग कर्डिले, साहेबराव वाफारे, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, युवती तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर सुधामती कवाद, कविता औटी, सोनाली सालके, जयश्री शिंदे, बाबासाहेब नऱ्हे, जेष्ठ नेते अरुण घनवट, अजिंक्यतारा दरेकर, सुभाष दुधाडे, आदी सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶🔶
स्व. अजितदादा हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारा नेता होता त्यामुळे महाराष्ट्र पोरका झाला त्यांच्यासारखा आक्रमकपणे काम करणारा नेता गेल्यामुळे जनता दुःखात आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले हे मोठे दुःख आहे.
– डॉ. श्रीकांत पठारे ( तालुकाध्यक्ष : शिवसेना (उबाठा), पारनेर)
🔶🔶🔶🔶
अजितदादांच्या जाण्याने ही मोठी धक्कादाय घटना आहे. राज्यात नवे तर देशात हळळ व्यक्त होत आहे. कामाचा अवका असणारा नेता गेला जनतेच्या कामासाठी झटणारे व भल्या पहाटे कामाची सुरुवात करणारे तळागाळातील जनतेची जाण असणारे कामाचे सूक्ष्म नियोजन व लक्ष देणारे नेतृत्व आपल्यातून गेले हे मोठे दुःख आहे. कामाला लागा एकजुटीने राहा ही शिकवण अजितदादा पवार यांनी नेहमीच दिली. गुलाबराव शेळके साहेब व उदयदादा शेळके व अजित दादांचे सबंध हे खूप प्रेमाचे होते.
– गीतांजली शेळके (अध्यक्षा, जी.एस. महानगर बँक)
🔶🔶🔶🔶🔶
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून गेले ४२ वर्ष मी सहकारी म्हणून काम केले व पारनेर तालुक्याच्या विकास कामांच्या बाबतीत नेहमीच त्यांच्याकडून सल्ला घेतला. संघटनात्मक पातळीवर काम करत असताना नेहमीच त्यांच्याशी माझा संबंध राहिला व सलोख्याचे संबंध निर्माण झाले अजितदादा पावर साहेब आपल्यातून गेल्यामुळे खूप मोठी हानी झाली आहे.
– अशोकराव सावंत (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहिल्यानगर)




