पारनेर / भगवान गायकवाड,
अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत पारनेर तालुक्यातील तनपुरेवाडी (निघोज) शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. रेसिडेन्शिअल हायस्कूल, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या या अंतिम स्पर्धेत तनपुरेवाडी शाळेने बालगटातील समूहगीत गायन आणि वैयक्तिक गीतगायन अशा दोन्ही प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
‘आनंदाचे गाणे’ तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तनपुरेवाडीचा संघ जिल्हा स्तरावर पात्र ठरला होता. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील अतिशय तुल्यबळ संघांशी झालेल्या चुरशीच्या सामन्यात तनपुरेवाडीच्या विद्यार्थ्यांनी ‘आनंदाचे गाणे’ हे श्रवणीय गीत अत्यंत प्रभावीपणे सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थित रसिक आणि परीक्षकांची मने जिंकत जिल्ह्याचे प्रथम पारितोषिक आपल्या नावे केले.
वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत शाळेचा विद्यार्थी कैवल्य योगेश कवाद याने आपल्या अष्टपैलू कलेचे प्रदर्शन केले. त्याने स्वतः हार्मोनिअम वाजवत ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ हा अभंग सादर केला. बालगटातील या स्पर्धेत इतर १३ तालुक्यांच्या स्पर्धकांना मागे टाकत त्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, या दोन्ही गीतांना वाद्यवृंद साथ स्वतः विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील शिक्षकांनी दिली होती, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.अविष्कार गायकवाड, दुर्गा लोखंडे, शिवन्या कवाद, श्रेयश मेहेर, रुचिका लंके, त्रिशा लंके, स्वरा राठोड, स्वरा सोनवणे, आराध्या सोबले, प्रिया गाजरे आणि कैवल्य कवाद. मुख्याध्यापक बन्सी गुंड सर, संतोष साबळे सर, कांतीलाल दिवेकर सर, मंगल भूकंन मॅडम, ज्योती थोरात मॅडम आणि गौतम साळवे सर.या यशाबद्दल बोलताना पारनेरचे गटशिक्षणाधिकारी श्री. विनेश लाळगे म्हणाले की, “तनपुरेवाडी शाळा शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रातही तालुक्यात अग्रेसर आहे.” तर विस्तार अधिकारी देवराम पिंपरकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना वैयक्तिक बक्षीस जाहीर केले. केंद्रप्रमुख नारायण बाचकर यांनीही शाळेच्या उपक्रमशीलतेचा गौरव केला.
🔶🔶🔶🔶🔶🔶
निघोज ग्रामस्थांकडून आनंदोत्सव….
तनपुरेवाडी शाळेने मिळवलेल्या या यशामुळे निघोज पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. सरपंच सौ. चित्राताई वराळ, उपसरपंच माऊली वरखडे, ग्रामपंचायत सदस्य सुधामतीताई कवाद, दिगंबरशेठ लाळगे, गणेश कवाद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ लाळगे आणि सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच तंटामुक्ती अध्यक्ष मंगेशदादा लाळगे, विश्वासराव शेटे, निवृत्तीशेठ तनपुरे व पालकांनी शाळेच्या या यशाचा अभिमान व्यक्त केला.




