पारनेर / ता. प्रतिनिधी  

गुरुवार दि. २६ फेब्रुवारी २०२६ पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यातील बहुतांश आदिवासी बांधवांना अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याचा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित केला. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे एका आदिवासी महिलेच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधत त्यांनी शासनाला जाब विचारला.

आ. दाते सरांनी सभागृहात बोलताना संबंधित महिलेचे निधन २२ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. मात्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अंत्यविधी उशिरा पार पडला. या घटनेमुळे आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न निर्माण झाला असून, अशा घटना राज्यात इतरत्र घडत आहेत का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली

या प्रश्नाद्वारे आमदार काशिनाथ दाते सरांनी आदिवासी समाजाच्या सन्मानाचा व मूलभूत अधिकारांचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.“अंत्यसंस्कारासाठीही जागा न मिळणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे; शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत,” अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडत सामाजिक न्यायाचा मुद्दा अधोरेखित केला. मतदारसंघातील तसेच राज्यातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून आमदार दाते सर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
आ. दाते यांनी संवेदनशील प्रश्न केला पाटेवाडी येथे पूर्वी वनविभागाच्या जागेत अंत्यविधी केले जात होते; मात्र एका तक्रारीमुळे संबंधित प्रकरणात अडचण निर्माण झाली. ग्रामपंचायतीने तत्काळ ठराव करून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केला आहे. तसेच जिल्ह्यात ज्या गावांमध्ये स्मशानभूमी उपलब्ध नाही, अशा गावांची माहिती संकलित करण्यात आली असून विशेष मोहिमेद्वारे जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मूलभूत सुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीचे काम मंजूर असल्यास त्या गावांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
– ना. जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *