चोंभूत / स्वप्निल भालेराव,
         तालुक्यातील म्हस्केवाडी गावातील आणि शिरूर या ठिकाणी स्थित असलेल्या मनीषा प्रदीप गोरडे यांना आयुर्विमा महामंडळाचा दिला जाणारा २०२५ मधील एमडीआरटी हा बहुमान मिळाला आहे. अतिशय कमी कालावधीत विमा एजन्सी घेतल्यापासून पहिल्या वर्षातच हा बहुमान मिळवणारी मनीषा गोरडे ह्या राजगुरुनगर व शिरूर भागातील ६८ वर्षाच्या इतिहासातील एकमेव विमा प्रतिनिधी ठरल्या आहेत. त्यांना मिळालेल्या बहुमानाबद्दल चोंभूत,म्हस्केवाडी शिरूर भाग व पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. सदर बहुमान एसडिएम मोघे यांच्या हस्ते मिळाला या वेळी उपस्थित एमएम जी. ए. जयवर्धन, सीएलआय अरुण मिरघे, एमएस समीर टोपरे, शाखाधिकारी कपिल माळवी, शिरीष मिरजकर व आदी विमा क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. हा बहुमान मिळाल्यामुळे अमेरिका येथील मायामी बीच या शहरात होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा मान मिळाला आहे.

चौकट – मिलियन डॉलर राउंड टेबल ( एमडीआरटी ) ही १९२७ मध्ये स्थापन झालेली एक व्यापार संघटना आहे. जी विमा दलाल आणि आर्थिक सल्लागारांना सर्वोत्तम व्यवसाय पद्धती स्थापित करण्यास आणि वित्तीय उत्पादनांमध्ये, विशेषतः जीवन विमा , अपंगत्व आणि दीर्घकालीन काळजी यासारख्या जोखीम-आधारित उत्पादनांमध्ये ग्राहकांची आवड वाढवण्यासाठी नैतिक आणि प्रभावी मार्ग विकसित करण्यास मदत करते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *