जवळे / प्रतिनिधी, 

पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर व जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे दहा झाडे माजी सरपंच मोहन आढाव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष भेट देण्यात आले होते. 
 याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पारनेर तालुका पत्रकार संघ अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, कार्याध्यक्ष शिरीष शेलार, सचिव तथा पर्यावरण मित्र लतिफ राजे, शहराध्यक्ष भगवान गायकवाड, पत्रकार आनंद भुंकन, माजी सरपंच विठ्ठल आढाव, अंकुश कोठावळे, अंकुश आढाव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण गायकवाड, ग्रामसेविका मनीषा शेळके, उद्योजक सुरेश म्हस्के, ग्रामपंचायत कर्मचारी दादाभाऊ साळवे आदी उपस्थीत होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *