दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी सायकल – शिक्षण प्रवासात मोठा दिलासा !

पारनेर/प्रतिनिधी :

शिक्षणप्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी गुरेवाडी, खडकवाडी आणि पळशी येथील विद्यार्थिनींना आमदार निधीतून सायकलचे वाटप करण्यात आले. “दुर्गम भागातील गोरगरीब विद्यार्थीनींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करताना मला स्वतःला समाधान मिळतं,” असे मत पारनेर-नगरचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.

गुरूवार, २४ जुलै २०२५ रोजी पळशी येथील श्री मलवीर विद्यामंदिर येथे सायकल वितरणाचा कार्यक्रम पार पडला. गुरेवाडी, खडकवाडी व पळशी येथील एकूण ४४ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. यात फक्त पळशीच्या २७ विद्यार्थिनींना प्रत्यक्ष सायकल देण्यात आल्या.
आमदार दाते सर म्हणाले की, “कन्हेर-पोखरीसारख्या दुर्गम भागात माझे शालेय शिक्षण झाले असल्याने सायकलची गरज आणि ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कशी मदत करू शकते, याची जाणीव आहे. म्हणूनच आज शासनाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे.”

महायुती सरकारच्या माध्यमातून शिक्षणात अडथळा ठरणाऱ्या गोष्टी दूर करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुलभ, सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्याचे हे पाऊल असल्याचेही आमदार दाते यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, संस्थेचे संचालक साहेबराव वाफारे, एस.डी. आंधळे, बाळशिराम आंधळे, बी.टी. आंधळे, अनंथा शिर्के, माजी सरपंच संजिवनी आंधळे, तसेच गणेश शिंदे, सुभाष राठोड, अनंत गांधी, भाऊ गागरे, पाराजी मधे, राजाराम मेंगाळ, सिताराम साळवे, कैलास चिकणे, नंदू शिंदे, विकास रोकडे, प्रसाद कर्णावट, अरुण गागरे यांच्यासह शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶
परिसरात खाजगी शाळांमध्ये जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध असूनही गोरगरीब व आदिवासी समाजातील मुल कौटुंबिक हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे श्री मलवीर विद्यामंदिर पळशी या शाळेत शिक्षण घेत आहेत. एकुण ३०० विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे दूरवरून चालत शाळेत येतात ह्याची जाणीव असल्यानेच गेल्या तिन वर्षांत ८४ सायकल या शाळेतील विद्यार्थ्यांना आमदार काशिनाथ दाते सर यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. सबंधित योजनांचे प्रस्ताव बनविताना पंढरीनाथ उंडे व संतोष तांबे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
– मुख्याध्यापक, श्री मलवीर विद्यामंदिर पळशी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *