जवळे येथे तब्बल १ कोटी ५७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

पारनेर/प्रतिनिधी 

शुक्रवार दि. २० मार्च २०२६
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात विकासकामांची दमदार घोडदौड सुरू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळे येथे तब्बल १ कोटी ५७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विकासाबाबत समाधान व्यक्त केले.



यावेळी बोलताना आमदार दाते सर म्हणाले, “जवळे गावाला मी नेहमीच विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. जिल्हा परिषद सभापती असताना देखील कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता आणि आज पुन्हा १.५७ कोटींच्या कामांचा शुभारंभ करत आहोत. जनतेच्या सेवेसाठी विकासकामांची नवी सुरुवात असुन आमचे काम केवळ पाट्या लावणे नसून प्रत्यक्षात दर्जेदार कामे पूर्ण करणे हेच आमचे ध्येय आहे.”


मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठीही या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणुन मी सातत्याने प्रयत्नशील असून, कुकडी डावा कालवा आवर्तन वेळेवर मिळावे यासाठी वेळोवेळी पालकमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरूच असतो असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच पारनेर तालुक्यातील शेतीच्या सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध पाणी योजनांच्या मंजुरीसाठीही सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


फक्त विकासकामेच नव्हे, तर मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कामही प्राधान्याने केले असल्याचे सांगत त्यांनी, “विकास आणि शांतता हीच प्रगतीची दोन चाके आहेत,” असे मत व्यक्त केले. राज्याच्या अर्थसंकल्पातून रस्त्यांच्या कामांसाठी जवळपास ४१ कोटी रुपयांचा निधी मिळविण्यात यश मिळाले, ही बाब त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, कार्याध्यक्षा सुधामती कवाद, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. कापसे, युवा तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, सरपंच पंकज कारखिले, सुरेश बोरुडे, सुभाष दुधाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार दाते सरांच्या कामकाजातील सातत्य, निर्णयक्षमतेचा ठसा आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे मतदारसंघात विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून “काम करणारे नेतृत्व” अशीच त्यांची ओळख अधिक बळकट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *