शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा आधारवड, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय शोकसभा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून ही शोकसभा उद्या रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे आता ही शोकसभा सोमवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा बँक सभागृह, पारनेर येथेच आयोजित करण्यात आली आलेची माहिती आ. काशिनाथ दाते यांनी सांगितले.
या शोकसभेसाठी पारनेर तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन आमदार काशिनाथ दाते सर यांनी केले आहे.
तालुक्याच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक वाटचालीत अजितदादा पवार यांचे योगदान अविस्मरणीय असून, त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी ही सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.




