शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर पोलीसांची विशेष कारवाई


अहिल्यानगर / प्रतिनिधी, 
दिनांक १५/०४/२०२६ रोजी निलक्रांतीचौक, अहिल्यानगर येथे शहर वाहतूक शाखेमार्फत विशेष नाकाबंदी कारवाई राबविण्यात आली. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशान्वये तसेच पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब बोरसे शहरवाहतुक शाखा, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन थांबवून ई-चलान मशीनद्वारे तपासणी करण्यात आली असता सदर वाहनावर अलर्ट प्राप्त झाला. त्यानुसार तत्काळ पुढील कायदेशीर कारवाई करून वाहन ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईमध्ये पोनि बाबासाहेब बोरसे, पोउपनि शमुवेल गायकवाड, पोउपनि मनसूर सय्यद, पोउपनि अनसार शेख, सफौ/रामराव शिरसाठ, पोहवा खेडकर, पोहवा/जहीर शेख, पोको/उंडे, पोको/दळवी, पोको/खंडागळे व वॉर्डन इरफान शेख हे अधिकारी व अंमलदार कार्यरत होते.

पुढील चौकशी व आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल दिपक सरोदे व पोलीस कॉन्स्टेबल रामराव शिरसाठ यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी सखोल चौकशी करुन संबंधित नांदेड सिटी पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्याशी समन्वय साधुन, पत्रव्यवहार करून तसेच सातत्याने संपर्क साधून माहितीची पडताळणी केली. चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले की ताब्यात घेण्यात आलेले वाहन क्रमांक MH-12-VV-5636, प्रकार HYUNDAI VERNA, इंजिन क्रमांक G4FLPV589463, चेसिस क्रमांक MALGU41DLPM031718 हे नांदेड सिटी पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्र १०५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८ (२), ३१८(४), ३१९(२), ३३६ (२), ३४० (२), ३(५) अंतर्गत गंभिर गुन्ह्याशी संबंधित असल्याचे आढळून आले. त्यानुसार आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर वाहन आज दिनांक ०६/०५/२०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रसाद जोशी, नांदेड सिटी पोलीस ठाणे, पुणे शहर यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.

सदर कारवाईत पोनि/बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली पोको/दिपक सरोदे व पोको/रामराव शिरसाठ यांनी अत्यंत दक्षता, सतर्कता व कार्यक्षमतेने काम करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या समन्वय व चौकशीमुळे कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

अहिल्यानगर शहर पोलीसांकडुन अशा प्रकारच्या नाकाबंदी व विशेष कारवाया सातत्याने राबविण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *