पारनेर, अहमदनगर
– गारगुंडी गावातील अनेक लाभार्थ्यांना वर्षानुवर्षे रेशनकार्ड मिळत नव्हते. पारनेर तहसील कार्यालयात हेलपाटे मारूनही समस्या सुटत नव्हत्या. मात्र, टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या सोनियाताई राजदेव यांनी पुढाकार घेऊन ही समस्या सोडवली. त्यांनी आयोजित केलेल्या विशेष कॅम्पच्या माध्यमातून रेशनकार्ड तयार करून घेतले आणि स्वतः ते लाभार्थ्यांच्या घरी पोहोचवले. या सामाजिक कार्याबद्दल गावकऱ्यांनी सोनियाताई राजदेव यांचा विशेष सत्कार केला.
टाकळी ढोकेश्वर गटात सोनियाताई राजदेव यांनी गेल्या वर्षभरापासून रेशनकार्ड, आधारकार्ड, बांधकाम कामगार कार्ड, आरोग्य शिबिरे अशा अनेक उपक्रम राबवले आहेत. विशेष म्हणजे, रेशनकार्ड तयार करण्यासाठी त्यांनी एक रुपयाही शुल्क आकारले नाही आणि तयार झालेली कार्डे स्वतः घरपोच आणून दिली. यामुळे गोरगरिब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
या सत्कार प्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रविंद्र राजदेव, नांदूर पठारचे माजी सरपंच भानुदास आग्रे, गारगुंडीचे माजी सरपंच बाळासाहेब झावरे, विलास झावरे, शंकर झावरे, अंकुश झावरे, दिलीप झावरे, राजेंद्र झावरे, दिनकर फापाळे, सुनील फापाळे, विनायक ठुबे, शिवाजी फापाळे, भाकर फापाळे, जयसिंगराव झावरे, निजामभाई शेख, मुराद शेख, संदिप झावरे, सुनीता परांडे, मीराबाई झावरे, वनिता झावरे, सुनीता फापाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
लाभार्थ्यांनी राजदेव दांपत्याच्या या पुढाकाराबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यामुळे गावकऱ्यांना मोठी मदत झाल्याचे समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य जनतेला सरकारी योजनांचा लाभ सहज मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




