वासुंदे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पारनेर/प्रतिनिधी : 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी दिलेला समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश आजच्या तरुण पिढीने आत्मसात करणे काळाची गरज आहे. वासुंदे ग्रामस्थांच्या एकजुटीने असा सामाजिक सलोखा जपणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे मत माजी उपसरपंच शंकरराव बर्वे यांनी व्यक्त केले.

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वासुंदे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमात महामानवास अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी उपसरपंच शंकर बर्वे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, युवा नेते अमोल उगले, उद्योजक दत्तात्रय साळुंके, इंजि. निकील दाते, स्वप्नील झावरे, बापूसाहेब गायखे, इंजि. प्रसाद झावरे, अमोल साठे, किरण पोपळघट, सचिन वाबळे, अमोल पोटघन, संग्राम झावरे, समीर कंदलकर, संजय झावरे, अरुण वाबळे, प्रवीण झावरे, विशाल झावरे, भाऊसाहेब हिंगडे, विकासआण्णा झावरे, गणेश शिरतार, सिकंदर शेख, इंजि सागर साळुंके, मनोज झावरे, निलेश गायखे, दत्ता शिरतार, सुमित औटी, गणेश बर्वे, गणेश साळुंके, गणेश झावरे, अक्षय दाते, निलेश भालके सर, शरद सैद, सुरेश शिंदे भास्कर दाते, भाऊ साळुंके, अशोक चेमटे सर, संतोष झावरे, संदीप खंडाळे, सोमनाथ झावरे, रुपेश साठे, रामनाथ जगदाळे, अविनाश साळुंके, विनायक झावरे, ग्रामविकास अधिकारी भास्करराव लोंढे, तलाठी शिंदे भाऊसाहेब, आदित्य शिर्के, उद्योजक दादा तळेकर, शांताराम शिंदे,संदीप उर्फ नामा दाते, किरण गायखे आदी वासुंदे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. प्रसाद झावरे यांनी केले तर आभार अमोल साठे यांनी मानले. 


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हीच खऱ्या अर्थाने समाजाची शक्ती आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. वासुंदे येथील ही जयंती म्हणजे केवळ सोहळा नसून, त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प आहे. तरुणांनी शिक्षणाद्वारे स्वतःची आणि गावाची प्रगती साधायला हवी.

– अमोल साठे (आंबेडकरी अनुयायी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *