वासुंदे (प्रतिनिधी):
वासुंदे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. निर्मला पोपट बर्वे तर व्हाईस चेअरमनपदी श्री. बाबाजी ठकाजी ठुबे यांची नावे सुजित झावरे पाटील यांनी कळविल्या नंतर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिला नेत्याला चेअरमनपदाची संधी मिळाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीमुळे संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा आणि वेग मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.


निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडल्यानंतर आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुप्रियाताई वसंतराव झावरे पाटील व सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन विशेष नागरी सत्कार करण्यात आला.

🔶🔶🔶🔶🔶🔶
पारदर्शक कारभाराचे आवाहन….
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, “सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि गतिमान ठेवावा.” सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी सर्व मार्गदर्शक, संचालक व ग्रामस्थांचे आभार मानले आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अधिक ताकदीने काम करण्याचे आश्वासन दिले.

🔶🔶🔶🔶🔶🔶
मान्यवरांची उपस्थिती….
या सोहळ्याला मा. सूर्यभान भालेकर, माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण झावरे, नारायण झावरे, शंकर बर्वे, बाळासाहेब झावरे, दिलीप पाटोळे, स्वप्निल झावरे, बापूसाहेब गायखे, चेतन बर्वे, पांडुरंग टोपले, पोपटराव बर्वे, सचिव आर. के. भांड यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *