पारनेर / भगवान गायकवाड,
जिल्हा महिला व बालविकास विभाग अहिल्यानगर, कार्यालयामार्फत दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन केले जाते.यावर्षीही चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.मुला-मुलींच्या अंगी असणारे विविध सूप्त गुण ओळखून त्याचा सर्वांगीण विकास करता यावा या हेतूने या बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते . या वर्षीचा बालमहोत्सव १६ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत टाकळी ढोकेश्वर ता.पारनेर येथे संपन्न झाला.
या बालमहोत्सवांमध्ये बैठे खेळ तसेच मैदानी खेळ व विविध गुणदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.साधारणपणे १४ खेळांमध्ये मुलांना सहभागी करण्यात आले होते अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण ३८ बालगृह आहेत या ३८ बालगृहांमधील ७०० मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये स्नेहालय संस्थेतील ४० मुले व मुली सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांनी सहभाग नोंदवून बक्षिसे मिळवली. मुलांच्या स्पर्धा व यशस्वी मुले खालील प्रमाणे बुद्धिबळ (छोटा गट) मयूर गायकवाड प्रथम.बुद्धिबळ (मोठा गट) दीपक पाटील द्वितीय कॅरम( छोटा गट) विघ्नेश चौधरी व सोनू सिंग प्रथम. गोळा फेक( मोठा गट) साई तुपे प्रथम, लांब उडी( मोठा गट) प्रमोद सांगळे प्रथम, १०० मीटर धावणे (लहान गट) स्वप्नाली भोसले प्रथम, मयूर गायकवाड प्रथम, शंभर मीटर धावणे (मोठा गट) लावण्या सरकार प्रथम, प्रमोद सांगळे तृतीय,खो-खो (लहान गट )स्नेहालयाचा गट द्वितीय क्रमांक, बुद्धिबळ (मोठा गट) राशी नरवडे, प्रथम लांबवडे मोठा गट राशी नरवडे प्रथम,लांब उडी( लहान गट )स्वप्नाली भोसले प्रथम, वैयक्तिक नृत्य( मोठा गट) प्रमोद सांगळे प्रथम, समूहनृत्य लहान गट- प्रथम,चित्रकला स्पर्धा (लहान गट )अंजली महतो प्रथम , चित्रकला स्पर्धा( प्रथम मोठा गट )स्नेहा कोठुळे प्रथम, साक्षी गाडे द्वितीय. प्रमोद सांगळे प्रथम, अजय वाघमारे तृतीय, वक्तृत्व स्पर्धा (लहान गट )विवेक परदेशी प्रथम, ( मोठा गट )सिद्धार्थ गायकवाड तृतीय, हस्ताक्षर स्पर्धा (मोठा गट) साई तुपे प्रथम, सिद्धार्थ गायकवाड द्वितीय,निबंध लेखन स्पर्धा (छोटा गट) मयूर गायकवाड प्रथम.
चाचा नेहरू बाल महोत्सव यामध्ये आयोजित सर्व स्पर्धांमध्ये २८ बक्षीसे स्नेहालय संस्थेतील मुलांनी पटकावली त्यामुळे फिरता चषक देखील स्नेहालय संस्थेस प्राप्त झाला. यशस्वी सर्व मुला मुलींचे महिला व बालविकास विभागाच्या वतीने कौतुक करण्यात आले तसेच स्नेहालय संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या. स्पर्धेत सहभागी करण्यापासून मुलांना महत्त्वाचे मार्गदर्शन करणे मध्ये चंद्रकांत शेंबडे, शुभाश राठोड, साक्षी जामगडे अनिता शिखरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यशस्वी सर्व मुला -मुलींचे स्नेहालय संस्थेतर्फे संजय बंदिष्टी व मा.सपना असावा यांनी कौतुक केले.





