`मुंबई महापालिकेच्या भाजप सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल महायुती व ग्रामस्थांकडून जंगी स्वागत`
बाभूळवाडे सारख्या एका छोट्याशा गावातून गेलेला माणूस जेव्हा मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराच्या सभागृह नेतेपदी विराजमान होतो, तेव्हा तो केवळ गावाचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा गौरव असतो, असे प्रतिपादन भाजप राज्य परिषद सदस्य *श्री. विश्वनाथ दादा कोरडे* यांनी केले.
बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील सुपुत्र मा. श्री. गणेशदादा खणकर यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) भाजप सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल, आज दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या जन्मगावी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मळगंगा माता सभामंडपात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *मा. आमदार काशिनाथ दाते सर* होते.
*दिग्गजांची उपस्थिती*
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी जमली होती. यामध्ये जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, माजी जि.प. सदस्य वसंतराव चेडे, राजाराम एरंडे, माजी पं.स. सभापती गणेशराव शेळके, सुभाषराव दुधाडे, राहुल शिंदे पाटील, सचिन वराळ पाटील, सोनाबाई चौधरी, अश्विनीताई थोरात, विक्रम कळमकर, माजी सभापती बाबासाहेब तांबे, शंकरराव नगरे, सोनालीताई सालके, अतुल माने, संग्राम पावडे, पांडुरंग गाडगे, तुकाराम येवले, अर्जुनराव नवले, रमेश गाडगे, कानिफनाथ ठुबे, अब्बास मुजावर, नवनाथ सालके, सुयश वाळुंज, ‘आपलं गाव फाउंडेशन’चे डॉ. सुरेश खणकर, भिवाजी जगदाळे, दत्ता जगदाळे, प्रशांत जगदाळे, निलेश कदम, मनसुख कोरडे,रजनीकांत जगदाळे , प्रमोद खणकर, वैशाली जगदाळे, निशिगंधा बोरुडे, स्वप्निल जगदाळे, उत्तम जगदाळे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*तालुक्याच्या प्रश्नांसाठी नवी आशा*
विश्वनाथ दादा कोरडे पुढे म्हणाले की, “गणेशदादांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध हे पारनेर तालुक्याच्या प्रलंबित पाणी प्रश्नांसाठी आणि विकासासाठी मैलाचा दगड ठरतील.”
अध्यक्षीय भाषणात *आमदार काशिनाथ दाते सर* यांनी सांगितले की, “पारनेरच्या मातीने नेहमीच कर्तृत्ववान माणसे घडवली आहेत. गणेशदादांनी मिळवलेले हे पद त्यांच्या कष्टाचे फळ असून संपूर्ण तालुक्याला त्यांचा अभिमान आहे.”
*’माझ्या मातीतील थाप मोलाची’ – गणेशदादा खणकर*
सत्काराला उत्तर देताना *गणेशदादा खणकर* भावूक झाले होते. ते म्हणाले, “मुंबईत कितीही पदे मिळाली तरी माझ्या गावातील ही पाठीवर पडलेली थाप माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. हा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही.” यावेळी त्यांनी निवडणूक रणनीती, आलेली आव्हाने आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.




