टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 
हिमोफिलिया हा ७० टक्के अनुवांशिक व ३० टक्के बदलते जनरेशनमुळे होत असल्याने जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसीत झाले असून उपचाराबरोबर व्यायामालाही तितकेच महत्व असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे प्रसिध्द रक्तविकार तज्ञ डाँ.गोपाळ बहुरूपी यांनी केले.

   अहिल्यानगर येथे शुक्रवार दि. १५ मे २०२६ आयोजित जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त ते बोलत होते.
  याप्रसंगी बालरोग तज्ञ डाँ.चेतना बहुरूपी, हिमोफिलिया फेडरेशन आँफ इंडिया नवी दिल्ली चे युथ चेअरमन सौरभ नलमवार,हिमोफिलिया फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष रामू गडकर, डाँ.अशोक ठाकरे,डाँ.रूपाली कुलकर्णी,डाँ.अमृता गवळी, डाँ.भाऊसाहेब खिलारी, हिमोफिलिया सोसायटी अहिल्यानगर चँप्टरचे अध्यक्ष दादा भालेकर,आसाराम तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


   यावेळी डाँ.बहुरूपी बोलताना म्हणाले की,पुर्वी निदाना अभावी हिमोफिलिया रूग्ण दगावण्याचे प्रमाण फार मोठे होते मात्र जसजसे तंत्रज्ञान वाढत गेले तसे हिमोफिलिया बाबत जागतिक पातळीवर जिन थेरपी,नाँन फँक्टर थेरपी बरोबर नव्याने येत असलेल्या टँबलेट व अत्याधुनिक फँक्टर ची उपलब्धतेमुळे हिमोफिलिया रूग्णांचे जिवन सुखकर झाले आहेत.

    याप्रसंगी सौरभ नलमवार म्हणाले की, निदाना नंतर उपचार पध्दती काळजीची पहिली पायरी असून याप्रसंगी डाँ.चेतना बहुरूपी बोलताना म्हणाले की,मनुष्य शरिराने विकलांग नसून बध्दीने विकलांग झाला तर काहीही करू शकत नाही याला अपवाद हिमोफिलिया परिवार असून तो बुध्दीने हुशार आहेत.बाल्य अवस्थेत हिमोफिलियाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

    याप्रसंगी डाँ.अशोक ठाकरे यांनी हिमोफिलिया रूग्णांना फिजिओथेरपी किती महत्वाची आहेत याबाबत मार्गदर्शन केले.

   याप्रसंगी डाँ.रूपाली कुलकर्णी यांनी हिमोफिलिया रूग्णांसाठी सुवर्णकाळ सुरू झाला असून रूग्णांना तातडीने लागणारे फँक्टर २४ तास उपलब्ध असल्याने हिमोफिलिया रूग्णांचे जिवनमान वाढणार आहेत.
 डाँ.अमृता गवळी,डाँ.भाऊसाहेब खिलारी,दादा भालेकर यांनी मार्गदर्शन केले.

    याप्रसंगी कार्यक्रमास डाँ.ज्ञानदेव आव्हाड,अरूण पानसंबळ,सचिन देऊळगावकर,शुभम कदम,श्रृति कुकडे,संगिता कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामू गडकर यांनी तर आभार आसाराम तळेकर यांनी मानले.
 
🔶🔶🔶🔶🔶
हिमोफिलिया रूग्णांसाठी साई सावली मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचा आधार…

गेल्या काही महीण्यांपूर्वी हिमोफिलिया फेडरेशन आँफ इंडिया नवी दिल्ली यांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील साई सावली मल्टीस्पेशालीटी हाँस्पिटल येथे हिमोफिलिया ट्रिटमेंट सेंटर सुरू केले असून रूग्णांना मोठा आधार मिळाला असल्याचे प्रतिपादन हिमोफिलिया फेडरेशनचे युथ चेअरमन सौरभ नलमवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *