निघोज / प्रतिनिधी, 
 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष (भाजप) निघोज-कान्हूर पठार मंडलाच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते आणि योग प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता आणि पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. योगाचार्य श्री. खंडुजी साळवे यांनी उपस्थितांना योग आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके करून घेतली तसेच त्यांचे महत्त्व आणि आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, मंडल अध्यक्ष किसनराव शिंदे, तालुका उपाध्यक्ष अतुल माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.यावेळी सरपंच पंकज कारखिले, तालुका उपाध्यक्ष अर्जुन नवले, संग्राम पावडे, विलास हारदे, ठकाराम गायखे, मनोहर राऊत, नवनाथ सालके, भीमदादा लामखडे, कानिफनाथ ठुबे, बबन व्यवहारे, रमेश गाडगे, माऊली पठारे, सचिन करकंडे, प्रशांत जगदाळे, मनसुख कोरडे, तुकाराम येवले, पंजाबराव पांढरे आदी उपस्थित होते. या शिबिरातून योगाचे महत्त्व आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *