पारनेर प्रतिनिधी : 
रांजणगाव मशीद येथील श्री संत बाळू मामा मंदिर (शिंदे मळा, कुरणमळा) येथे शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी ‘मासिक अमावस्या’ अत्यंत उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
अमावास्येनिमित्त सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आळंदी देवाची येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. प्रणव महाराज शिंदे यांचे सुश्राव्य ‘कीर्तन सेवा’ पार पडणार आहे. कीर्तनानंतर बाळू मामांची भव्य ‘महाआरती’ होईल आणि त्यानंतर सर्व भाविकांसाठी ‘महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात गायनाचार्य म्हणून ह.भ.प. प्रविण महाराज मगर (वाघुंडे) आणि ह.भ.प. बाप्पू महाराज कोळगे आपली सेवा रुजू करणार आहेत. तसेच, यावेळची ‘अन्नदान सेवा’ श्री. बाळासाहेब तुकाराम काळे आणि श्री. रमेश नामदेव काळे (अस्तगाव) यांच्या वतीने करण्यात येणार आहे. कीर्तन सौजन्य ह.भ.प. सार्थक महाराज बनकर यांचे असून, संपूर्ण जाहिरात सौजन्य श्री. कृष्णा कैलास शिंदे (श्री साई कन्स्ट्रक्शन, रांजणगाव) यांनी लाभले आहे.
या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी रांजणगाव व परिसरातील समस्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, अशी विनंती मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *