टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधि 
ता.१५ अंजना सोशल फाऊंडेशन च्या माध्यमातून “प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना” अंतर्गत नवीन लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी निघोज-अळकुटी आणि जवळा-कान्हूर पठार गटातील गावांमध्ये विशेष कॅम्प आयोजित केले जाणार असल्याची माहीती अंजना सोशल फाऊंडेशन च्या संपर्क कार्यालयातुन देण्यात आली.
या योजनेच्या माध्यमातून ७० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना २ लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळते.कॅम्पच्या माध्यमातून गावागावांत जाऊन नागरिकांना योजनेची माहिती देऊन अर्ज भरण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.यासाठी फाउंडेशनच्या स्थानिक सहकाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन कोरडे यांनी केले आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, कमी खर्चात मोठे विमा संरक्षण प्रदान करते. हे कॅम्प 17 ते 25 मे च्या दरम्यान होणार आहेत. या कॅम्पमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना योजनेचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे. अर्ज भरण्यासाठी गावातील अंजना सोशल फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही कोरडे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *