टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 
दि. २० ऑगष्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक टाकळी ढोकेश्वर शाळेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद भंडारी साहेबांच्या हस्ते राष्ट्रसंत आनंदऋषीजी वाचनालय कक्षाचे उद्घाटन तसेच संपर्क फाउंडेशन मार्फत परिसरातील ९७ शाळांना १ ली ते ५ वी च्या वर्गांसाठी अभ्यासक्रमाचे डिव्हाईस व LED टीव्हीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब, साहित्यिक श्री.आनंद अवधानी, रोटरी क्लब अहिल्यानगरचे सुनील कटारिया, संजय कटारिया, गटविकास अधिकारी दयानंद पवार, गटशिक्षणाधिकारी श्री. कांतिलाल ढवळे,विस्तार अधिकारी श्री.चांगदेव गवळी, केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे, सरपंच सौ. अरुणाताई खिलारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. 


यावेळी भंडारीसाहेबांनी बोलताना पर्यावरण संवर्धन आणि वाचन चळवळ कशाप्रकारे वाढविता येईल याविषयी मार्गदर्शन केले. वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. ग्रामपंचायत, माजी विद्यार्थी, पालक यांच्या लोकसहभागातून टाकळी ढोकेश्वर शाळेत झालेल्या भौतिक सुविधांचे कौतुक केले. शालेय परिसरात राबविले जात असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी साहेबाच्या हस्ते शालेय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. मुंबई येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. शिरीष कटारिया यांनी वडिलांच्या स्मरणार्थ दिलेल्या ५१ हजार रुपये देणगी मधुन उभ्या राहिलेल्या वाचनालय कक्षाचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले.


यावेळी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेबांनी बोलताना सांगितले की, भौतिक सुविधा सोबतच आपल्याला ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यकआहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंददायी शिक्षण दिले जाते. सोबतच त्यांनी या वर्षी पासून नव्याने राबविला जात असलेला जिल्हा परिषदेचा माझी आदर्श शाळा योजनेविषयी माहिती दिली.

पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.कांतीलाल ढवळे साहेबांनी पारनेर तालुक्यातील शाळांमधील शैक्षणिक प्रगती विषयी विस्तृत विवेचन करून टाकळी ढोकेश्वर शाळेतील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
 या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुन्या पेन्शन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रवीण झावरे तर सूत्रसंचालन आदर्श शिक्षक श्री.मंगेश खिलारी व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र ठुबे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप झावरे,श्री.प्रताप खिलारी सर, श्री दादाभाऊ नवले सर, श्री. राजू खरमाळे सर, श्री प्रवीण खाडे सर शाळेतील महिला शिक्षक वृंद श्रीम.भनगडे, श्रीम.गाडेकर, श्रीम.घोलप, श्रीम.तांबे, श्रीम.तांबोळी आणि भाळवणी व टाकळी ढोकेश्वर बीटातील शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *