क्रांतिकारक सेनापती बापट शालेय नाट्य स्पर्धा- योगेश वाबळे,साक्षी श्रीमंदीलकर,तेजस कोरडे,आरोही ठुबे, संध्या मोरे उत्कृष्ट अभिनेता 

पारनेर / भगवान गायकवाड, 
न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर,मराठी विभाग,आडवाटेंच पारनेर, पारनेर तालुका कला शिक्षक संघटना वतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित क्रांतिकारक सेनापती बापट शालेय नाट्य स्पर्धेत चाटे किड्स पारनेर, जनता विद्या मंदिर,कान्हुरपठार, सी टी बोरा महाविद्यालय शिरूर यांनी विजेतेपद पटकावले.

पारनेर चे थोर सुपुत्र क्रांतिकारक सेनापती बापट यांच्या नावाने आडवाटेंच पारनेर व न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर, पारनेर तालुका कला शिक्षक संघटना हे दरवर्षी क्रांतिकारक सेनापती बापट शालेय नाट्य स्पर्धा प्रसिद्ध साहित्यिक, कलाकार संजय पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येतात.स्पर्धेसाठी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, कन्हैया ॲग्रो,कला शिक्षक संघटना, श्रीराम नाट्य मंडळ,कान्हूरपठार यांनी बक्षिसे प्रायोजित केले होते.पारनेर महाविद्यालयालयात स्पर्धा उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते सुरेंद्र शिंदे, प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ तुकाराम थोपटे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,माजी अध्यक्ष मार्तंड बुचुडे,शरद झावरे, शशिकांत भालेकर,सनी सोनावळे, संतोष सोबले, मराठी विभाग प्रमुख डॉ हरेश शेळके, डॉ माया लहारे आदींच्या उपस्थितीत झाले.
बक्षिस वितरण प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर,कला शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड,पारनेर तालुका कला शिक्षक संघटना अध्यक्ष कानिफनाथ गायकवाड, उपाध्यक्ष विष्णूपंत धुमाळ,सचिव ज्ञानेश्वर कवडे, कोषाध्यक्ष शरद आंधळे, महीला आघाडी प्रमुख प्रतिभा फलके, नवनाथ झावरे,कलाश्रुती वाळुंज,मीरा पुजारी, श्रीराम नाट्य मंडळ कान्हूरपठार चे रशिद इनामदार, संतोष ठुबे,आडवाटेंच पारनेर चे प्रमुख प्रा तुषार ठुबे, अशोक गायकवाड,प्रा संकेत ठाणगे आदींच्या हस्ते करण्यात आले.
*निकाल*
*महाविद्यालय गट:*
प्रथम: सी टी बोरा कॉलेज, शिरूर 
द्वितीय: न्यू आर्ट्स कॉलेज, पारनेर 

उत्कृष्ट अभिनेत्री :- संध्या मोरे (सी. टी. बोरा, शिरूर) 
उत्कृष्ट दिग्दर्शक: कल्पेश शिंदे ( न्यू आर्टस्, पारनेर)

माध्यमिक गट:
प्रथम: जनता विद्या मंदिर कान्हूर पठार 
द्वितीय: संत निळोबाराय विद्यालय, पिंपळनेर 
तृतीय: न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर 

उत्कृष्ट अभिनेता: योगेश वाबळे (जनता विद्यामंदिर, कान्हूर पठार)
उत्कृष्ट अभिनेत्री: साक्षी मंदिलकर (जनता विद्यामंदिर, कान्हूर पठार)
उत्कृष्ट दिग्दर्शक: प्रा. तुषार ठुबे

प्राथमिक गट 
प्रथम :चाटे किड्स स्कुल, पारनेर 
द्वितीय: पारनेर पब्लिक स्कूल, पारनेर 
तृतीय: जनता विद्या मंदिर, कान्हूर पठार 
इरा इंटरनॅशनल स्कूल,जवळे 

उत्कृष्ट अभिनेता: तेजस कोरडे (चाटे किड्स, पारनेर)
उत्कृष्ट अभिनेत्री: आरोही ठुबे (पारनेर पब्लिक स्कूल पारनेर)
उत्कृष्ट दिग्दर्शक : नजमा राजे, राणी औटी (चाटे किड्स, पारनेर) 

परीक्षक .. ज्ञानेश्वर कवडे ( चित्रकार)
 प्रतिभा फलके ( उपक्रमशील कलाशिक्षिका )
 मीरा पुजारी ( पारनेर कलाभूषण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *