टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी, 


आजचे विज्ञान उद्याचे तंत्रज्ञानआहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी बहुविष्याचे ज्ञान घ्यावे असे प्रतिपादन डॉ. शशिकांत शिंदे याने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या प्रमुख व्याख्यानात केले. 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. आपल्या प्रमुख भाषणात त्यांनी विज्ञानातील नवसंशोधन, संशोधनवृत्ती आणि तंत्रज्ञान विकास यांचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या विज्ञानातील प्रयोग आणि संशोधन हेच उद्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा पाया ठरतात, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर होते. त्यांनी आपल्या भाषणात भविष्यातील संधीबाबत मार्गदर्शन मिळाले त्याचा विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल तसेच नोकरीच्या संधी मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करावे असे मत व्यक्त केले.
 राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून पोस्टर प्रेसेंटेशन व रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक किशोर बोरुडे, द्वितीय क्रमांक चेमटे अक्षदा व महामुनी शीतल तर तृतीय क्रमांक आंधळे श्रावणी व बांडे समृद्धी यांनी मिळवला तर रेल मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी ढोले व अनुराधा झावरे, द्वितीय क्रमांक शिंदे साक्षी व शिंदे पियुष तर तृतीय क्रमांक पूजा पानसरे व अनुराधा कदम यांनी मिळवला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा.संजय गायकवाड यांनी केले, तर प्रा. शैलजा टिंगरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संकेत ठाणगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रमेश झावरे यांनी मानले.

कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जागरूकता व प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *