पारनेर / भगवान गायकवाड, 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक अपघात विमा योजना आहे. विमा नसलेल्या लोकसंख्येला विमा सुरक्षेखाली आणण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे बँकेतील ग्राहकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा आधार झाला आहे.

     पारनेर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र नारायणगव्हाण बँकेतील ग्राहक गिरीश धोंडीबा गायकवाड यांचे अपघाती निधन झाले. बँकेने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 20 रुपयांत 2 लक्ष रुपयांचा अपघाती विमा उतरवला होता. गिरीश गायकवाड यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्य नंदा गायकवाड व धोंडीबा गायकवाड यांच्याकडे 2 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी शाखा व्यवस्थापक मा श्री राकेश मांदाडेसाहेब , उप व्यवस्थापक अनमोल कटीयार, कॅशियर सुमित भोर, पीटीएस बापूसाहेब वावरे, अविनाश औटी आधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *