चोंभूत / स्वप्निल भालेराव,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या १७६७ ते १७९५ पर्यंत मराठा संघराज्याचा भाग असलेल्या मालवा प्रदेशाच्या शासक होत्या . त्या काळात भारतीय राजकारणाचे नेतृत्व करणाऱ्या काही मोजक्या महिलांपैकी एक होत्या. त्या प्रथम राजेशाही म्हणून आणि नंतर मध्य भारतातील महेश्वर आणि इंदूर येथे असलेल्या होळकर राजघराण्याच्या शासक म्हणून काम करत होत्या , ज्या काळात होळकर राजघराण्याचा शिखर मानला जात असे. त्या त्यांच्या परोपकारासाठी, विशेषतः अनेक हिंदू मंदिरांच्या बांधकामासाठी देखील ओळखल्या जात होत्या.पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्यामुळे हिंदू धर्म वाढला आणि अनेक मंदिरांची बांधणी झाली असे गौरवउद्गार शिरापूरचे आदर्श सरपंच भास्कर उचाळे यांनी काढले ते चोंभूत येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त बोलत होते. याप्रसंगी निघोज गावचे सरपंच सचिन वराळ पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान चोंभूत व समस्त ग्रामस्थ चोंभूत यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी चोंभूत गावठाण पर्यंत महापुरुषांच्या प्रतिमांची देखील मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमास उपस्थित पाहुण्यांच्या वतीने अभिवादन करून अभिवादन सभा घेण्यात आली. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी भ्रमणध्वनी वरून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी किसन गुंजाळ(सोसायटी संचालक ), संतोष खाडे (सोसायटी संचालक )रामदास पारखे, प्रणल भालेराव(ग्रामपंचायत सदस्य ),बंडू भालेराव,दत्तात्रय सांगडे, गणेश भालेराव,दीपक भालेराव,संजय भालेराव,सचिन जमदाडे,प्रतीक लामखडे,आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमा चोरामले, नवनाथ उचाळे, मोहन बरकडे, बाबुराव बरकडे, रामा कोळपे गणेश बरकडे,पावसा बरकडे, संतोष बरकडे,नन्हू बरकडे इत्यादींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलक्रांती तरुण मित्र मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सचिन भालेराव यांनी केले.




