पारनेरकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मानले आभार

पारनेर / प्रतिनिधी, 
शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर सुजित झावरे पाटील यांनी पारनेर शहराच्या विकासाचा धडाका लावला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला पारनेरचा डीपीआर (DPR) मंजूर करून आणल्यानंतर, काही दिवसांपूर्वीच मंजूर झालेल्या २ कोटींच्या निधीसह, आज पारनेर शहरासाठी आणखी ४ कोटी रुपयांचा असा एकूण ६ कोटी रुपयांचा निधी पारनेरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला असल्याची माहिती सुजित झावरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विकासकामांचा मार्ग मोकळा….
सुजित झावरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पारनेरच्या प्रलंबित प्रश्नांना गती दिली आहे. पहिल्या टप्प्यात २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, ज्यातून खालील कामे केली जाणार आहेत:
पारनेर ते सिद्धेश्वर वाडी रस्ता सुधारणा.
पारनेर ते बुगेवाडी रस्ता काम.
पारनेर शहर दशक्रिया घाट पार्किंग व्यवस्था आणि काँक्रिटीकरण.
आता नव्याने मंजूर झालेल्या ४ कोटींच्या निधीमुळे पारनेर शहरातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे आणि पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत.

आगामी काळातील ‘मास्टर प्लॅन’…
पत्रकार परिषदेत बोलताना सुजित झावरे पाटील यांनी पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प जाहीर केला. ते म्हणाले: “पारनेर ही पराशर ऋषींची पुण्यभूमी आहे. या पवित्र नगरीचा विकास करणे आमचे कर्तव्य आहे. या ६ कोटींच्या निधीनंतर आगामी काळात पारनेर शहरासाठी अद्ययावत पाणीपुरवठा योजना, सर्व प्राचीन देवस्थानांचा पुनर्विकास, सौर ऊर्जा प्रकल्प, आणि सर्व वाडी-वस्त्यांवरील रस्ते व पथदिवे बसवून त्यांचे लोकार्पण करणार आहोत.”

सुजित झावरे पाटील यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे पारनेरकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आलेल्या या निधीमुळे पारनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *