पारनेर / भगवान गायकवाड, 
    दिवटे पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकां प्रती असलेल्या भावना सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन व्यक्त केल्या. साक्षी कातोरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले प्रत्येक मुलाच्या ओंजळीतले स्वप्न फुलावं यासाठी अखंड प्रयत्नशील राहणारे शिक्षक आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने आम्हा विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा दाखवत असल्याची भावना व्यक्त केली. सान्वी झोके, अक्षरा ठोकळ, मानसी भालेकर, ईश्वरी मुंगसे,हर्षद कोल्हे, रीझा शेख, आराध्या येणारे, आर्या कोल्हे, कृष्णा ठाणगे यांच्या सह विद्यार्थ्यांनी शिक्षकांन प्रती कृतज्ञता व्यक्त करून मनोगत व्यक्त केले. प्राचार्या सौ.सुरेखाताई दिवटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *