पारनेर/प्रतिनिधी, 
जामगाव येथील ॲग्री एम. पी. विद्यालयात दिनांक ४ जुलै २०२५ रोजी विठ्ठल-रुक्मिणीच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सकाळी ११ वाजता विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीचे प्रस्थान झाले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत टाळ आणि विठ्ठलाच्या गजरात दिंडी गावातील मळगंगा माता मंदिरापर्यंत पोहोचली.

या दिंडीत विद्यार्थ्यांनी “विठ्ठल-विठ्ठल” च्या गजरात पावले खेळली, तर मुलींनी मंदिर परिसरात रिंगण आणि फुगडी खेळून आनंद साजरा केला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.फंड सर, श्रीमती घनगाव मॅडम, श्रीमती साळवे मॅडम, पवार मॅडम, राहिंज मॅडम, श्री.देवकाते, श्री.घोती सर, मेहर भाऊसाहेब, यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते आणि त्यांनीही दिंडीत सहभाग घेतला.
या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांची जपणूक होण्यास मदत झाली. ॲग्री एम. पी. विद्यालयात हा दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंददायी वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *