वडगाव सावताळ जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
पारनेर/प्रतिनिधी :
वडगाव सावताळ परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी काम करणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे असे मत सरपंच संजय रोकडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील शिंदेमळा जिल्हा परिषद शाळेमध्ये शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे सरपंच संजय रोकडे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
शिंदे मळा येथील जिल्हा परिषद शाळेत सर्वसाधारण परिस्थिती असलेले आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. शाळेमधील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी पुण्यातील मित्र परिवाराच्या मदतीने विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या-पेन, पेन्सिल-पट्टी, कंपास, चित्रकला वही, रंगपेटी असे शालेय साहित्य तसेच क्रीडा साहित्य वाटप केले.
सामाजिक जाणीवेतून डॉ. संदिप व डॉ. स्मिता नरवडे, आय टी इंजि. विश्वास व वृषाली तळोले, फर्मासिस्ट रविंद्र जपे, कृषी अधिकारी मिलिंद अडसूरे, यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच संजय रोकडे यांच्यासह चेअरमन दादाभाऊ रोकडे, बबन शिंदे, लहू शिंदे, केशव रोकडे, सत्यवान शिंदे, पोपट शिंदे, अर्जुन रोकडे, दत्तात्रय साळुंके, भाऊसाहेब शिंदे, सुरेश काळे, अशोक शिंदे, संतोष गांगड, अविनाश शिंदे, नानाभाऊ गांगड, अर्जुन साळुंके, वंदना साळुंके, शितल भनगडे, कविता शिंदे, स्वाती शिंदे, भाग्यश्री शिंदे, संगीता गांगड, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




