पारनेर/प्रतिनिधी : 
सामाजिक बांधिलकी जपत सावरगावचे सुपुत्र आणि मुंबई येथे उद्योग-व्यवसायात कार्यरत असलेले युवा उद्योजक प्रदीप चौधरी यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने, सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी गावातील आणि परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यामध्ये शालेय बॅग, वही, पेन आणि इतर साहित्याचा समावेश होता. तसेच, गावातील वयोवृद्ध व्यक्तींना छत्रीचे वाटप आणि वृक्षारोपण करून त्यांनी समाज उपयोगी कार्याला प्राधान्य दिले.या उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सावरगावचे उपसरपंच बाळासाहेब चिकणे, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते बाबाजी लांडगे, ग्रामपंचायत सदस्य इंद्रवन माने, सचिन घुले, पप्पू लांडगे, सुहास गायके, शुभम गायके, सुदर्शन माने यांच्यासह प्रदीप चौधरी यांचा मित्रपरिवार आणि सहकारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी शिवाजीशेठ बेलकर मित्र मंडळ, जाणता राजा प्रतिष्ठान आणि स्वराज्य कंट्रक्शन यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रदीप चौधरी यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अनावश्यक खर्च टाळून समाजहितासाठी केलेल्या या कार्याने त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. गावातील तरुण पिढीला सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला असून, अशा उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
वाढदिवस हा आनंद साजरा करण्याचा प्रसंग आहे, परंतु तो समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी देखील आहे. अनावश्यक खर्च टाळून मी माझ्या गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वयोवृद्धांना छत्री आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहून मला खूप समाधान वाटले.

प्रदीप चौधरी (युवा उद्योजक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *