पारनेर / भगवान गायकवाड, 
 
        पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथील माने मळा येथे दत्त जयंती निमित्त व श्री. अवधूत राजू पांढरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत जादूचे प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

        महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांनी जादूच्या एकसरस एक प्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली. जादू, संमोहन, विज्ञान अशा अनेक गोष्टींना संगीत साथ दिल्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. छोटी जादूगार कु. जादू शिरोळे हिने देखील आपल्या जादूच्या प्रयोगाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह वाढविला. याप्रसंगी सौ. रेश्मा शिरोळे, माजी सरपंच सौ. अनुराधा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

        कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार अरुण वाळुंज यांनी हा कार्यक्रम प्रत्येक गावात विविध नेतृत्वाला सोबत घेत आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राहुल तामखडे, भाजपा नेते शब्बीरभाई इनामदार, दूध संकलन चेअरमन, खादी ग्रामोद्योग संचालक पारनेर राजू दत्तात्रय पांढरे, सुप्रसिद्ध गझलकार गणेश भोसले, गडकिल्ले अभ्यासक बाळासाहेब पठारे, उद्योजक एकनाथ गडकर, सुरेश पठारे, युवराज पांढरे, सचिन पांढरे, दादाभाऊ पांढरे,. गणेश खणसे, शुभम खणसे, आनंदा पांढरे.संदिप पांढरे. नितीन माने. राजू माने, यांसह अनेक गावांतील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

         राहुल तामखडे यांनी अवधूत पांढरे यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत असे मनोरंजन व विज्ञानाचे कार्यक्रम आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक राजू पांढरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *