नागेश्वर मित्र मंडळाचा उपक्रम – पाणी वाचवा, जीवन वाचवा चा संदेश
पारनेर / भगवान गायकवाड,
नागेश्वर मित्र मंडळ पारनेर वतीने आयोजित राज्यस्तरीय पारनेर मॅरेथॉन स्पर्धा शनिवारी 7 फेब्रुवारी ला आयोजीत केल्याची माहिती मंडळाचे प्रमुख वैभव बडवे,, तेजस औटी,गणेश कावरे,, सतिष म्हस्के, कल्याण थोरात, हर्षवर्धन औटी यांनी दिली. स्पर्धेचे यंदा 25 वे वर्ष आहे.
नागेश्वर मित्र मंडळाचे वतीने स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पारनेर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.शनीवारी 7 फेब्रुवारी ला पारनेर हिंद चौक मधून स्पर्धा प्रारंभ होणार आहे.स्पर्धा साठी कन्हैया ॲग्रो, पुष्पा स्टील, सुपा,नगरपंचायत पारनेर नगराध्यक्षा डॉ विद्या बाळासाहेब कावरे, उपनगराध्यक्षा प्रियांका सुभाष शिंदे, सर्व नगरसेवक, ,जय माता दि उद्योग समूहाचे प्रमुख मारूती रेपाळे, प्रसिद्ध सी.ए. कौस्तुभ काकडे असोसीएटस, मातोश्री कन्स्ट्रक्शन चे प्रताप अंबुले, पारनेर पंचायत समिती शिक्षण विभाग, यशराज उद्योग समुहाचे प्रमुख सुनील थोरात सह प्रायोजक राहणार आहेत.स्पर्धा साठी खुल्या गटात पुरूष साठी असून यात राज्यातील स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. पहीली ते चौथी मुले,मुली, पाचवी ते सातवी मुले मुली आठवी ते दहावी मुले मुली असे सहा गट असुन या शालेय गटात फक्त पारनेर तालुक्यातील स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के, अश्विन कोल्हे, धीरज महांडुळे यांनी सांगितले.स्पर्धा साठी 28 जानेवारी पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन मंडळाचे प्रमुख नजीर तांबोळी,डॉ नरेंद्र मुळे, योगेश वाघ,प्रमोद गोळे, विजय इंगळे,अनिकेत औटी, उदय शेरकर, दत्ता शेरकर, सचिन शिंदे, नरेंद्र शिंदे, वैभव बडवे,नवनाथ गाडगे, राहुल सोंडकर, आकाश जोशी, सुहास मोढवे,वैभव पठारे, दिगंबर शिंदे, गणेश डेरे, इंद्रजित देशमुख, सतिष इंगळे,सुनील कावरे, शिवाजी औटी,समीर शेख,रामचंद्र तराळ,,आकाश शेळके, प्रमोद शेळके, संतोष भोर,प्रा तुषार ठुबे, , वैभव पानसरे, दत्ता वाटमारे, सारंग बोरूडे, , किरण शिंदे, सुभाष कावरे, वैभव पानसरे, अशोक गायकवाड,समृद्ध मुळे,प्रा संकेत ठाणगे, वेदांत शिंदे , मनोज गंधाडे, ऋषीकेश बडवे,प्रणव शेरकर, स्वानंद मुळे यांनी केले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पेन्शन मधून विजेत्यांना ट्राफी….
पारनेर मॅरेथॉन स्पर्धा गेलया 24 वर्षे पासून सुरू असून स्पर्धा तील बक्षीस विजेत्यांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निवृत्ती वेतन मधून दरवर्षी ट्राफी देण्यात येते. स्पर्धा साठी पोलिस निरीक्षक पथक ,पारनेर महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना पथक, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज परिचारीका पथक, पारनेर ग्रामीण रूग्णालय, 108 रूग्णवाहीका आदींनी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.




