पारनेर / भगवान गायकवाड, 

स्वराज्य संकल्पिका, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आद्यगुरू राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी पारनेरमध्ये उत्साहात साजरी होणार आहे. सावित्री फातिमा सद्भावना मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी ३ ते ६ या वेळेत आनंद लॉन्स, पारनेर येथे करण्यात आले असल्याची माहिती मंचचे कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांनी दिली.

   या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनावर आणि विचारांवर आधारित मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील महिला वक्ते आपले विचार मांडणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने. डॉ. सोनिया संदिप औटी,ॲड. भारती तराळ,मिरा पुजारी, प्रा. तहेनीश साहिल शेख, शगुप्ता शेख,रोशनी गायकवाड,आकांशा शिंदे तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक शिंदे करणार आहेत. बहुजन समाजातील आदर्शांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि राजमाता जिजाऊंचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्री फातिमा सद्भावना मंचचे अध्यक्ष किसनराव पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी टीम कार्यरत आहे. यामध्ये मारुती शेरकर, भाऊसाहेब औटी, प्रा. शाहूराव औटी, भिकाजी जगदाळे, हमजेखा मोमीन, संतोष खोडदे, सलीम राजे, रमीज राजे, राजुभाई शेख, डॉ. मुद्दसर सय्यद, डॉ. सादिक राजे, पत्रकार लतिफ राजे, सुरेश जावळे, सरस्वती जावळे, दत्तात्रय औटी यांसह बहुजन चळवळीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
पारनेर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि महिलांनी या जयंती सोहळ्यास उपस्थित राहून विचारांचा हा जागर ऐकावा, असे आवाहन सावित्री फातिमा सद्भावना मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *