पारनेर/प्रतिनिधी :
 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील पत्रकार विनोद उर्फ बाळासाहेब गायकवाड यांची निवड झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. यानिमित्ताने नगर दक्षिणचे माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील व अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गायकवाड यांचा सत्कार व सन्मान सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमात डॉ. विखे पाटील यांनी गायकवाड यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक करत, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि सत्य बातम्यांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. सुजितराव झावरे यांनीही गायकवाड यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत, पत्रकारितेच्या क्षेत्रात निष्ठेने काम करण्याचा सल्ला दिला. गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील समस्यांना वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त केला.या सोहळ्यास पत्रकार संघाचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गायकवाड यांच्या निवडीमुळे टाकळी ढोकेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *