पारनेर / भगवान गायकवाड, 
  पारनेर शहरातील जागृत देवस्थान श्री ग्रामदैवत नागेश्वर मंदिर महापूजा व उत्सव मोठ्या आनंदात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी पारनेर शहरातील उद्योजक प्रमोद विठ्ठल सातपुते , सारिका प्रमोद सातपुते, विजय विठ्ठल सातपुते, अशोक रामचंद्र सातपुते, बाळकृष्ण रामकृष्ण सातपुते, द्यानेश्वर रामचंद्र सातपुते, शोभा विठ्ठल सातपुते या परिवाराच्या वतीने ग्रामदैवत श्री नागेश्वर महापूजा व रुद्राभिषेक करण्यात आला.

     श्रावण महिन्यात श्री ग्रामदैवत नागेश्वर मंदिर परिसरात मनोभावे पूजा करण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांची गर्दी होत असते. प्रारंभी प्रभात काळी श्री नागेश्वर मंदिर मध्ये होमहवन, रुद्राभिषेक मंदिर पुजारी योगेश वाघ यांनी भक्तिभावाने हा धार्मिक विधी केला. त्या नंतर शहरातील भाविक भक्त यांनी देवाची भव्य मुकुट मिरवणूक काढली. हि मिरवणूक प्रारभं श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर पासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी शहरातील भाविक भक्त महिला, बाल गोपाळ, ग्रामस्थ यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. हि मिरवणुक नागेश्वर मंदिर पासून प्रारंभ होऊन हनुमान मंदिर पासून शिवाजी रोड मार्गे भैरवनाथ मंदिर परिसरातून परत श्री ग्रामदैवत नागेश्वर मंदिर परिसरात आणली गेली.
 यावेळी शहरातील सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यानंतर दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजता महाआरती करण्यात आली तर दुपारी एक ते चार वाजे पर्यंत सातपुते परिवाराकडून महाप्रसाद देण्यात आला. संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत भजन संध्या आयोजित केली होती तसेच रात्री नऊ ते सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत श्री ग्रामदैवत नागेश्वर पालखी मिरवणूक मंगलमय व आनंदी वातावरणात काढण्यात आली. या वेळी पालखी मिरवणूक असणाऱ्या रस्त्यावर भाविक भक्तांनी सडा रांगोळी टाकून शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. या पालखी मिरवणूक मध्ये शहरातील सर्व धर्मियांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *