पारनेर/प्रतिनिधी : 
वासुंदे येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागली आहे. गावांतील मळईवस्ती ते शिर्केमळा या स्थानिक शिवपानंद रस्त्याच्या मुरमीकरणाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजितराव झावरे पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कामामुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मळईवस्ती ते शिर्केमळा या रस्त्याची दुरवस्था झाली होती. पावसामुळे आणि खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना तसेच शेतकऱ्यांना शेतीमाल ने-आण करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सुजितराव झावरे पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या मुरमीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली आहे.

या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, सरपंच विमलताई झावरे, रणजीत पाटील, आणि भाऊसाहेब सैद यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इंजि. प्रसाद झावरे, दिलीपराव पाटोळे, बापूसाहेब गायखे, लहानू झावरे, शरद पाटील, बाळासाहेब झावरे, पो. मा. झावरे, इंजि. निकिल दाते आणि संतोष झावरे यांसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भूमिपूजन प्रसंगी पाराजी झावरे, भास्कर झावरे, गणेश झावरे, सिद्धार्थ झावरे, रामदास झावरे, बाबाजी झावरे, बन्सी झावरे, भाऊसाहेब झावरे, संभाजी झावरे, आबाजी झावरे, शंकर झावरे, साहेबराव झावरे, मंगेश झावरे आणि प्रशांत वाकचौरे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, जेणेकरून पावसाळ्यात होणारा त्रास कायमचा दूर होईल, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी विकासकामांचा आढावा घेतला. गावातील इतर प्रलंबित प्रश्नही टप्प्याटप्प्याने सोडवले जातील, असे आश्वासन यावेळी सुजितराव झावरे पाटील यांनी दिले. या कामामुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
मळईवस्ती ते शिर्केमळा हा रस्ता खराब असल्यामुळे पावसाळ्यात इथल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. विशेषतः शेतीमाल बाजारात नेण्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे.
सुजितराव झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठपुराव्यामुळे या शिवपानंद रस्त्याच्या मुरमीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे. अनेक वर्षांची ही प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. 

– शंकरराव बर्वे (माजी उपसरपंच, वासुंदे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *