वासुंदे परिसरातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

पारनेर – प्रतिनिधी 
    तालुक्यातील वासुंदे शिक्री ठाकरवाडी बोकनकवाडी लाखेवस्ती याठिकाणी आदिवासी समाजाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे आदिवासी व दुर्गम भागातील मुले मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांकडून आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप मदत लाखमोलाची असल्याचे गौरवोद्गार युवा नेते दिपक लंके यांनी काढले आहे.

   मंगळवारी पारनेर तालुक्यातील वासुंदे परिसरातील ५ जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. वासुंदे गावठाण, बोकणकवाडी, लाखेवस्ती, ठाकरवाडी आणि वाबळे वस्ती येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना स्व. सुभद्रा मारुती बर्वे यांच्या स्मरणार्थ डॉ. उदय बर्वे आणि सचिन बर्वे यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.

या वेळी वासुंदे ग्रामपंचायत सदस्य पोपट साळुंके, माजी उपसरपंच महादू भालेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोपट हिंगडे, भागुजी दादा झावरे पत्रकार शरद झावरे, युवा नेते अमोल उगले, दत्तात्रय साळुंके, अरुण चेमटे, बाबाजी खराबी, बापूसाहेब चत्तर, रायभान औटी, प्रल्हाद लोंढे, डॉ. बाबासाहेब गांगड, जयेश झावरे, प्रवीण गांगड, नवनाथ केदार, धोंडीभाऊ ठुबे, संतोष भालेकर, राहुल टोपले, राजेंद्र दाते सर, किसन धरम सर, प्रल्हाद भालेकर, सर्जेराव जाधव सर यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाले, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही या साहित्य वाटपाबद्दल आनंद व्यक्त केला आणि दात्यांचे आभार मानले. हा उपक्रम स्थानिक समाजात शिक्षणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *