पारनेर / ता. प्रतिनिधी,  

पारनेर तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देवीभोयरे- शिवडोह लिंक कॅनॉल प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून या प्रश्नाला अखेर गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. देवीभोयरे व वडझिरे परिसरातील शेतकऱ्यांनी लिंक कॅनॉलचे काम तातडीने मंजूर करून सक्तीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करत प्रकल्प मार्गी लावावा, या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासन व शासन स्तरावर तातडीच्या हालचाली सुरू झाल्या.

आज कृष्णा खोरे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अक्षय बरकले यांनी संबंधित शेतकऱ्यांना मंचर येथे चर्चेसाठी बोलावून घेतले. यावेळी पंधरा दिवसांच्या आत भूसंपादन प्रक्रियेबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यानंतर या प्रश्नाला अधिक गती मिळाली.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यापूर्वी जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांच्या अडचणी व पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन दाते सरांनी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी देवीभोयरे व वडझिरे येथील नागरिकांसमोरच मुख्य अभियंता चोपडे व धुमाळ यांना लिंक कॅनॉलचे काम तातडीने मंजूर करून सक्तीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करत काम मार्गी लावण्याचे स्पष्ट आदेश दिले.

यावेळी अंबिका माता ट्रस्ट अध्यक्ष शिवाजीराव जाधव, विश्वनाथ गाजरे गुरुजी, मा. उप सरपंच विकास सावंत, बाबुराव मुळे, व्हा. चेअरमन गोपीचंद बेलोटे, मा. उपसरपंच दत्तात्रय दौलत बेलोटे, सुभाष किसन बेलोटे, बाबुराव एकनाथ बेलोटे, अक्षय राजाराम बेलोटे, भाऊसाहेब पोपट सरडे, कमलाकर लहू बेलोटे, यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांचे संवेदनशील प्रश्न, पाणी, सिंचन, शेती व विकासकामांशी संबंधित प्रश्न केवळ बैठकीपुरते मर्यादित न ठेवता संबंधित विभागांकडे सातत्याने माझा पाठपुरावा आहे, देवीभोयरे-शिवडोह लिंक कॅनॉलसारखा रखडलेला प्रश्न मार्गी लागण्यासाठी शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवत जलसंपदामंत्री विखे पाटीलांशी सातत्याने चर्चा केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे काम तातडीने मंजुर करुन मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या, मतदारसंघातील नागरिकांना न्याय मिळावा, शेतीला पाणी मिळावे आणि ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी माझा संघर्ष असेल. 

– आमदार काशिनाथ दाते सर 
(विधानसभा सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *