पारनेर / भगवान गायकवाड,

       राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सावित्री-फातिमा सद्भावना मंच या दुःखद प्रसंगी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा एक धडाडीचा लोकनेता आज आपल्यातून हरपला आहे. प्रशासनावर असलेली मजबूत पकड, कामाचा प्रचंड उरक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता नेहमीच विकासाच्या केंद्रस्थानी राहिला.
मंचच्या वतीने आम्ही त्यांच्या कार्याचा गौरव करतो आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 
“एक कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *