विश्वनाथदादा कोरडे यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाचा उपक्रम; २४ नोव्हेंबरला गणपती फाटा येथे आयोजन

पारनेर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यात सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे राज्य परिषद सदस्य विश्वनाथदादा कोरडे यांच्या संकल्पनेतून ‘जलतारा’ प्रकल्पांतर्गत जलतारा खड्डे घेण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गणपती फाटा (कान्हूर-पारनेर रोड) येथे होणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ आमदार काशिनाथ दाते सर व महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळीत वाढ करणे, पावसाचे पाणी जमिनीत जिरवून त्याचे संवर्धन करणे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत मुरावे आणि त्यातून भूजल साठ्यात वाढ व्हावी, या दृष्टिकोनातून जलतारा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरात जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यासह ग्रामस्थ, शेतकरी आणि युवकांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.

या शुभारंभ सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी बांधव, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव चेडे, राहुल शिंदे पाटील, अरुणराव ठाणगे, दिनेशराव बाबर, शिवाजी काका खिलारी, महायुती पारनेर तालुका, भाजपा पारनेर तालुका आणि विश्वनाथदादा कोरडे युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.फ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *