कडूस येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पारनेर: महिला दिन एक दिवस नसतो तो वर्षभर आसतो. स्त्रियांनी समाजाला एक नवीन दिशा दिली आहे. प्रत्येक स्त्री ही माते समान असते. आधुनिक काळात स्त्री ने स्वताचे निर्णय स्वतः च घेतले पाहिजे. आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी तणावमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सुषमाताई रावडे यांनी मांडले.
कडूस ग्रामपंचायतीच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार काशिनाथ दाते यांच्या सूचनेनुसार जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विवीध क्षेत्रातील बहुमोल योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या कार्यक्रमात सुषमा रावडे बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) असा आहे की,महिलांचा मान सन्मान आदर करणारा पक्ष आहे. महिलांनी कौटुंबिक व इतर जबाबदाऱ्या सांभाळत तणावमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावा. ज्या महिला चुल आणि मुल या पलीकडे जाऊन समाजामध्ये परिवर्तन घडवून दाखवते ती स्वतंत्र आणि सक्षम महिला आहे. महिलांनी स्वतः ला सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्लेषा ताजने यांनी केले तर सूत्रसंचालन राखी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन काळे मॅडम यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्राम महसूल अधिकारी सरिता देशमुख, मुख्याध्यापिका जयश्री काळे, ग्रामविकास अधिकारी आश्लेषा ताजने, आरोग्य सेविका अर्चना काशिद, राजेंद्र रावडे, आशा सेविका उज्वला रणसिंग, अंगणवाडी सेविका मैनाबाई लंके, आरोग्य विभागाच्या सुनिता मुंगसे, उपसरपंच छायाताई रावडे, माजी सरपंच मीनाताई मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य राखी शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.




