तिखोल तलावाचे जलपूजन संपन्न
पारनेर/प्रतिनिधी :
तिखोल येथील सततच्या पावसामुळे लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, आज तलाव क्रमांक १ चे जलपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी पाण्याच्या बचतीवर जोर देत पुढील पिढीच्या भवितव्यासाठी जलसंपत्ती जपण्याचे आवाहन केले.सुजित झावरे पाटील म्हणाले, “ज्या भागात पाणी आहे, तिथे शेतकरी बेसुमार उपसा करतात आणि पाणी संपल्यावर पश्चाताप करतात. पुढील पिढीला खरी संपत्ती द्यायची असेल, तर ती पाण्याची बचत आहे.” त्यांनी स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या कार्यकाळातील जलसंधारणाच्या कार्याचा गौरव केला. पारनेर तालुक्यात काळू मध्यम प्रकल्प (ढवळपुरी), शिवडोह मध्यम प्रकल्प (वडझिरे), भांडगाव मध्यम प्रकल्प, मांडओहोळ कॅनॉल अस्तरीकरण, पिंपळगाव जोगा चारी नूतनीकरण, निघोज येथील काळभुजा प्रकल्प आणि २०० हून अधिक पाझर तलाव अशी मोलाची कामे झाली. ही जलसंपत्ती आजही जुन्या पिढीच्या स्मरणात आहे. पाण्याचे साठे जपून वापरले तरच पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित राहील, असेही त्यांनी नमूद केले.या जलपूजन कार्यक्रमाला पारनेर बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे, पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब झावरे, माजी सरपंच भाऊसाहेब सैद, भगवान वाळुंज, भिकाजी वाळुंज, संभाजी वाळुंज, दिलीप पाटोळे, शिवाजी ठाणगे, नागचंद ठाणगे, सुभाष ठाणगे, सोनू मंचरे, बाळासाहेब ठाणगे, संदीप ठाणगे, योगेश ठाणगे, प्रतिक ठाणगे, शहाजी ठाणगे, विशाल ठाणगे, विजय ठाणगे, उत्तम साळवे, रामदास ठाणगे, भानुदास ठाणगे, प्रसाद झावरे यांच्यासह काकणेवाडी, वासुंदे, तिखोल व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात जलसंधारण आणि पाण्याच्या काटकसरीच्या महत्त्वावर चर्चा झाली.
🔶🔶🔶🔶🔶🔶
तिखोल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते या शेतीला वरदान असलेला तिखोल तलाव हा यावर्षी पावसाच्या पहिल्या टप्प्यातच पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे पाण्याची समस्या सध्या तरी मिटली आहे.
अरुणराव ठाणगे
(माजी सभापती पारनेर बाजार समिती)




