पारनेर / भगवान गायकवाड,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत पारनेर येथील आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन संचलित जिजामाता कन्या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण २० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह या परीक्षेत यश मिळवून शिष्यवृत्तीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. सादिक राजे यांनी या यशाची अधिकृत माहिती दिली.
हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून, त्यांच्या जिद्दीला मिळालेली योग्य दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले. शालेय अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावतो आणि त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस एक भक्कम पाया मिळतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांची नामावली…
या परीक्षेत खालील १० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कु.गायत्री संजय दिवटे,कु. आदिती अनिल दुश्मन, कु. आर्या तुळशीराम जगताप, कु. सिद्धी जगन्नाथ औटी, कु. साक्षी वसंत म्हस्के,कु. परिणीती शिवाजी सोबले, कु. श्रावणी शांताराम शिंदे, कु. श्रेयस गणेश जाधव,कु.आदित्य अशोक औटी, कु.प्रतीक प्रवीण गाडे, शाळेतील शिक्षक नंदा चेडे, शिक्षक सोपान गवते, सारिका वाघमारे आणि सुनंदा घुले यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप, वेळेचे नियोजन आणि कठीण विषयांच्या तयारीबाबत सातत्याने मार्गदर्शन केले. ‘शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना स्पर्धा परीक्षांचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे,’ असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक डॉ. सादिक राजे, विश्वस्त फहाद राजे आणि मुख्याध्यापक संतोष ठाणगे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ग्रामीण भागातील मुलांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत आपली चमक दाखवल्याबद्दल पालकांकडूनही आनंद व्यक्त केला जात आहे. या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आगामी वर्षात इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.




