पारनेर / सौ. निलम सुरेश खोसे पाटील,
कुरुंद येथील संजीवनी प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक या महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची , तर श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निक या महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे पुणे जिल्हयातील रांजणगाव गणपती येथील एसपीएम ऑटोकॉम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड करण्यात आली. या कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सचिन सोनटक्के व एच आर मॅनेजर सिद्धेश्वर घोंगडे यांनी विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यू घेवून निवड केली.
कॅम्पस इंटरव्ह्यू कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रथम सॉलीसीटर दिवंगत गुलाबराव शेळके, दिवंगत अॅड स्व. उदय शेळके व श्री सरस्वती माता पूजनाने मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सचिन सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना एल. आर. मिडीया चा वापर करून कंपनीची माहिती दिली . कंपनीची प्रगती समजावून सांगितली. त्यातून विद्यार्थ्यांनी या कंपनीत का जावे ? याविषयी विद्यार्थ्यांना योग्य व अचूक मार्गदर्शन देण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे उदाहरणं देवून जिद्द, चिकाटी व मेहनत याचे जीवनातील महत्त्व पटवून दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिलदत्त कापसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन करताना “यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही व कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही” असे बोधवचन सांगितले.
निवड झालेल्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांची उन्हाळी २०२६ ही एमएसबीटीई, मुंबई यांच्यामार्फत घेतली जाणारी बोर्ड परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, कंपनीत ऑन रोल वर नोकरीत रुजू करून घेतले जाणार आहे. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनी अधिकारी यांचेकडून कंपनी च्या वतीने कामावर रुजू होण्याचे पत्र प्रदान करण्यात आले.
कॅम्पस इंटरव्यू मध्ये मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाचे विद्यार्थी जयदीप बेंद्रे, समीर भालेकर, भालके ऋत्विक, ढवळे प्रणव, बोरुडे अनिकेत, कऱ्हे अमोल, शेख असलम, नवले आदित्य, फलके अथर्व, सातव कुणाल, बोरगे अनिकेत, कोठावळे सुदर्शन, वारे कुमार, गाडीलकर समीर, निचित तेजस, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागाचे विद्यार्थी ठोंबरे मयूर, घेगडे सुमित, वाळके यश, वारे कुमार, बोरुडे ओम, करके सोहम या सर्व विद्यार्थ्यांची निवड झाली असून मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजय जाधव व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. किशोर कोकणे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निक या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे इंजिनीरिंग विभागाचे विद्यार्थी कोळपे आशिष, कोठारे निखिल, नवले आदित्य, जाधव तुषार यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड झाली. कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विक्रांत मल्लाव सर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागाच्या प्रा. शितल गायकवाड यांनी कॅम्पस कॅम्पस इंटरव्ह्यूचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.अलका रुपनर यांनी केले. तर आभार विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय जाधव यांनी मानले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संजीवनी प्रतिष्ठान या संस्थेचे सचिव सर्फराज पठाण, संस्थेच्या खजिनदार सुमनताई शेळके, जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षा व अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके, प्रसिद्ध उद्योजिका स्मिता शेळके, पालक वर्ग, प्राचार्य डॉ. सुनिलदत्त कापसे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे .
🔶🔶🔶🔶🔶🔶
पारनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात संजीवनी प्रतिष्ठान संस्थेचे हे पॉलिटेक्निक महाविद्यालय नामांकित असून येथे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत , त्यामुळे येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांचा मोठा ओढा असतो . ]




