वासुंदे / प्रतिनिधी,
वासुंदे येथील पारखे वस्ती ते तोरेवस्ती रस्ता मजबुतीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन आज सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
या रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे पारखे वस्ती, तोरेवस्ती तसेच परिसरातील ग्रामस्थांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने या कामाला विशेष महत्त्व आहे.
भूमिपूजन समारंभास सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच पारखे वस्ती, तोरेवस्ती व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकासकामाचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी रस्त्याचे काम मंजूर करून प्रत्यक्षात सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेली विविध कामे सातत्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात भूमिपूजन समारंभ पार पडला.




