पारनेर / ता. प्रतिनिधी,
कासारे ते वाघदरा, वाफारेवाडी शिवरस्ता खडीकरण व मजबुतीकरण करण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ आ. काशिनाथ दाते सर यांचे शुभहस्ते पार पडला. आठ दिवसांपूर्वी वाघदरा-कासारे परिसरातील पंधरा ते विस महिला भगिनींनी पारनेर येथे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांची भेट घेऊन या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. महिलांनी मांडलेल्या या प्रश्नाची तातडीने दखल घेत आमदार दाते सरांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला आणि अवघ्या आठ दिवसांत ‘मौजे कासारे येथील कासारे ते वाघदरा ते वाफारेवाडी शिवरस्ता खडीकरण व मजबुतीकरण करणे’ या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ झाला.
यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले, “काही दिवसांपूर्वी वाघदरा परिसरातील महिला माझ्याकडे या रस्त्याच्या अडचणी घेऊन आल्या होत्या. त्यांनी मांडलेल्या प्रश्नाची तातडीने दखल घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे आज अवघ्या आठ दिवसांत या रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ होत आहे. नागरिकांनी विश्वासाने आपले प्रश्न माझ्याकडे मांडावेत; ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
कासारे गावामध्ये आजपर्यंत झालेल्या विकासकामांपैकी सुमारे ९५ टक्के कामे माझ्या माध्यमातून मार्गी लागलेली आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेले प्रश्न केवळ आश्वासनांपुरते न ठेवता ते प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून सोडविणे, हीच माझी भूमिका असून त्या समस्यांवर प्रशासनाच्या माध्यमातून मी निश्चितच येत्या काळात कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून देईल,” असेही आमदार दाते यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला उद्योजक धनंजय निमसे, वसंत दातीर, गारगुंडी माजी चेअरमन रंगनाथ फापाळे ग्रापं सदस्य शैला दातीर, सचिन खरात, संगीता दातीर, ताराबाई खरात, भागुबाई खरात, हिराबाई खरात, इंदुबाई दातीर, नबाबाई दातीर, राहीबाई दातीर, अलका दातीर, सुरेखा पानमंद, उज्वला खरात, सविता दातीर, मंजुळा खरात, जिजाबाई दातीर, रतन दातीर, कांता दातीर, मंगल दातीर, सुमन खरात, उषाबाई दातीर, सिंधू खरात, लताबाई खरात, जनाबाई खरात, शांताबाई दातीर, ज्योत्स्ना चौरे, आशा पाणमंद, हिराबाई कासुटे, लहानुबाई खरात यांच्यासह बाळासाहेब दातीर, संदीप खरात, रामदास खरात, लहू खरात, मारुती खरात, हनुमंत दातीर, बबन दातीर, बाळशिराम दातीर, मिनीनाथ पानमंद, नाना नरड, किसन खरात, भागा खरात, बाबाजी दातीर, विकास दातीर, संतोष पानमंद, सचिन खरात, शरद दातीर मेजर, गोरख दातीर, बाबासाहेब दातीर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेषतः महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या प्रश्नासाठी आमदार दाते यांची भेट घेणाऱ्या महिलांच्या मागणीला अल्पावधीतच मिळालेला प्रतिसाद पाहून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. “प्रश्न मांडला आणि अवघ्या आठ दिवसांत काम सुरू झाले,” यामुळे वाघदरा-कासारे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आमदार दाते सरांच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक भावना व्यक्त होत होती.
🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️ “वाघदरा परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्याची अडचण आमदार काशिनाथ दाते सरांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेतली, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. अवघ्या आठ दिवसांत कासारे ते वाघदरा, वाफारेवाडी शिवरस्ता खडीकरण व मजबुतीकरण कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. जनतेचा प्रश्न समजून घेऊन तो प्रत्यक्ष कामातून मार्गी लावण्याची आमदार दाते सरांची कार्यपद्धती निश्चितच प्रेरणादायी आहे. या कामासाठी पाठपुरावा करून रस्ता मंजूर करून दिल्याबद्दल आमदार दाते सरांचे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो.”
– धनंजय निमसे, उद्योजक




