पारनेर / भगवान गायकवाड, 
    ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण व्हावे, या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पानोली (ता. पारनेर )येथे भव्य ‘आरोग्यवर्धिनी सर्व रोग निदान शिबिर’ उत्साहात पार पडले. 

    जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ.रामचंद्र थोरात यांनी केले.तर संयोजन सरपंच संदिप गाडेकर आणि ऐक्य सेवा सेंटरचे तुकाराम वाखारे यांनी केले.प्रमुख उपस्थिती मध्ये यशदा उपमहासंचालक माहिलनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती .याप्रसंगी गट विकास अधिकारी दिलीप सोनेकुसळे, कुलकर्णी साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे, पळवे आरोग्य केंद्राचे डॉ. सुदाम बागल, आणि विस्तार अधिकारी कैलास जगताप यांची विशेष उपस्थिती होती.तसेच माजी सरपंच शिवाजी शिंदे, उपसरपंच नवनाथ खामकर, माजी उपसरपंच प्रशांत साळवे. ज्येष्ठ नागरिक नारायणराव गायकवाड, नामदेव अण्णा गाडेकर, गोरक्ष भगत.तालुका दूध संघ संचालक दादाभाऊ वारे, माजी सरपंच अनिल गाडेकर, दत्ता वारे,रामदास शिंदे, रघुनाथ जाधव, संजयजी भगत. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामभाऊ थोरात. आदी मान्यवर उपस्थित होते.

      यशदा, पुणे येथून आलेल्या तज्ज्ञ आरोग्य अधिकारी यांनी गावकऱ्यांना विविध आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि निरोगी जीवनशैली कशी जगावी, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि इतर सामान्य आजारांची मोफत तपासणी करून रुग्णांना औषधोपचार सुचवण्यात आले. पंचक्रोशीतून आलेल्या शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचालन छाया मापारी, रामदास चौरे (सर )आणि संतोष खोडदे (सर )यांनी केले. आभार उपसरपंच नवनाथ खामकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *