पारनेर / भगवान गायकवाड,
पंचायत समिती शिक्षण विभाग पारनेर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तनपुरेवाडीने आपल्या दै दीप्यमान कामगिरीने तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पारनेर व पानोली येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत शाळेने सांघिक आणि वैयक्तिक गटात अनेक पदके पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी निश्चित केली आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत सर्वात चुरशीच्या ठरलेल्या समूहगीत गायन (लहान गट) स्पर्धेत तनपुरेवाडी शाळेच्या संघाने आपल्या सुश्राव्य सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली आणि तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशासह या संघाची निवड आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
वैयक्तिक श्रेणीतही विद्यार्थ्यांनी आपले कसब दाखवले. बालगटात कैवल्य योगेश कवाद याने वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याचीही निवड जिल्हास्तरासाठी झाली आहे. तसेच, किलबिल गटात कार्तिकी सुग्रीव रसाळ हिने आपल्या आवाजाची जादू दाखवत द्वितीय क्रमांक संपादन केला.केंद्रस्तरीय स्पर्धेतही यशाची परंपरा कायम निघोज केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांत यश मिळवले आहे अपेक्षा किशोर गाडीलकर हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक (किलबिल गट) ,आलिया फिरोज हवालदार वक्तृत्व स्पर्धा (किलबिल गट) उत्तेजनार्थ बक्षीस ,आरोही संतोष तनपुरे वेशभूषा सादरीकरण ,उत्तेजनार्थ कार्तिकी प्रवीण श्रीमंदिलकर हस्ताक्षर स्पर्धा ,
शाळेच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तनपुरेवाडी शाळेने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. गटशिक्षणाधिकारी विनेश लाळगे, विस्तार अधिकारी देवराम पिंपरकर, कांतीलाल ढवळे आणि व्होरा मॅडम, चांगदेव गवळी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.तसेच निघोज केंद्राचे केंद्रप्रमुख नारायण बाचकर, सरपंच सौ. चित्राताई सचिन वराळ, उपसरपंच माऊली वरखडे,ग्रामपंचायत सदस्य सौ. सुधामतीताई कवाद, दिगंबरशेठ लाळगे,श्री गणेशशेठ कवाद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ लाळगे, उपाध्यक्ष दिलीप लंके आणि मुख्याध्यापक बन्सी गुंड सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड सुप्त गुण असतात, त्यांना योग्य व्यासपीठ आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जिल्हा व राज्यस्तरावर नक्कीच चमकतात, हे तनपुरेवाडीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.” असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.
या यशाबद्दल माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वासराव शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेशदादा लाळगे, मार्गदर्शक निवृत्तीशेठ तनपुरे आणि सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे संपूर्ण तनपुरेवाडी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे




